व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Election commission: आयोगाकडून मतदार याद्यांचे अशुद्धीकरण; काँग्रेसचा आरोप

Election commission: आयोगाकडून मतदार याद्यांचे अशुद्धीकरण; काँग्रेसचा आरोप

Congress claims over 25,000 duplicate names in Nagpur Rural : निवडणूक आयोगाचा दावा फोल; नागपूर ग्रामीणमध्ये २५ हजारांहून अधिक दुबार नावे असल्याचा दावा

Nagpur मतदार याद्यांच्या दुरुस्तीचा आणि पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाला आहे. मतदार यादी पुनर्चनेनंतर नागपूर ग्रामीणमधील प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये तब्बल २५ हजार ८०१ दुबार नावे आढळली असून, हजारो मतदारांची नावे, वय आणि फोटोंमध्ये गंभीर चुका झाल्याचे उघडकीस आले आहे. हा थेट मतदार याद्यांचे अशुद्धीकरणाचा प्रकार असल्याचा घणाघाती आरोप रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे MP shyamkumar barwe यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारावर आक्षेप घेत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे.

निवडणूक आयोगाकडून दुबार नावे, मृत मतदार आणि स्थलांतरितांची नावे वगळून अचूक यादी तयार करण्यासाठी एसआयआर कार्यक्रम राबवला जात असल्याचा दावा केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात एका-एका विधानसभा मतदारसंघात ७ ते १२ हजारांपर्यंत दुबार नावे समोर आली आहेत. प्रत्येक मतदाराकडून फॉर्म आणि आधार कार्ड घेऊनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर चुका झाल्याच कशा, असा थेट सवाल खासदार बर्वे यांनी उपस्थित केला आहे. काही नागरिकांनी अर्ज भरला नसतानाही त्यांची नावे यादीत समाविष्ट झाल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

Devendra Fadnavis : दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

एका मतदाराचे मॅपिंग एकाच केंद्रावर झाले असतानाही त्याचे नाव दोन वेगवेगळ्या मतदारसंघांच्या किंवा केंद्रांच्या याद्यांमध्ये आढळले आहे. नवीन फोटो देऊनही ते अपडेट करण्यात आलेले नाहीत. यावरून तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर मोठा गोंधळ झाल्याचे स्पष्ट होत आहे. याची विधानसभा व केंद्रनिहाय तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी, नवीन फोटो देऊनही ते अपडेट न करणाऱ्या दोषींवर कारवाई करून कारणांचे स्पष्टीकरण द्यावे, या सर्व चुकांची चौकशी करून दुरुस्तीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे, ग्रामीण अध्यक्ष अश्वीन बैस, ज्येष्ठ नेते सुनील केदार, कुंदा राऊत, प्रकाश वसू आदी प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Supriya Sule : निवडणूक आयोगातील मतभेदांवर सुप्रिया सुळे आक्रमक

 

मतदारसंघनिहाय दुबार नावांची आकडेवारी:
• कामठी: ११,९०० (सर्वाधिक)
• हिंगणा: ७,०८५
• सावनेर: १,९९४
• काटोल: १,७८०
• उमरेड: १,७२०
• रामटेक: १,३२२
(एकूण दुबार नावे: २५,८०१)

error: Content is protected !!