Land-reserved-for-a-public-undertaking-sold-registrar-suspended : बेसा येथील आनंद कॉपोरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत घोटाळा, स्वतःच दिली कबुली
Nagpur नागपूर ग्रामीण येथील आनंद को.ऑपरेटिव्ह सोसायटीची सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव असलेली जागा नियमबाह्य पद्धतीने विकून केलेल्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली. यामुळे सहकार मंत्री यांनी या प्रकरणी आलेला चौकशी अहवाल चुकीचा असल्याची कबुली देत साहाय्यक निबंधक यांच्या निलंबनाची घोषणा केली.
या घोटाळ्याप्रकरणी मुख्य अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक महिन्यात चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन मंत्र्यांनी सभागृहात दिले. नागपूर येथील आनंद सोसायटी येथील खसरा क्रमांक १०अ आणि १० ब या जागेवर टाकलेल्या सार्वजनिक उपक्रमासाठी टाकलेल्या ११ हजार १०७ चौरस फुटाची आरक्षित जागा संस्थेचे सचिव कैलास चुटे यांनी आर्थिक लाभापोटी बेकायदेशीर पद्धतीने विकले.
Vasant Khandelwal : मोर्णा-विद्रुपा नद्यांच्या पूररेषेचा प्रश्न अधिवेशनात!
या प्रकरणी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले. सार्वजनिक उपक्रम म्हणून ट्रान्सफॉर्मरसाठी आरक्षित असलेली जागा चुटे यांनी आर्थिक व्यवहार करून प्लॉटधारक साळुंखे यांना दिली. बेसा ग्रामपंचायतमध्ये असताना सोसायटीचे सचिव चुटे यांनी दोन ले-आऊट सार्वजनिक उपक्रमासाठी असल्याचे दाखवले होते.
MLA Sajid Khan Pathan : आमदाराला धमकी, मुख्यमंत्री म्हणाले पूर्ण सुरक्षा देऊ
मात्र बेसा नगरपंचायत झाल्यानंतर नकाशात लेआऊट मधील जागा बेकायदेशीर पद्धतीने विकल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर याची चुकीची नोंद बेसाच्या मुख्य अधिकारी यांनी घेतल्यामुळे ते ही यात दोषी आहेत. ज्या उपनिबंधकांनी चुकीचा अहवाल दिला त्यांचेही निलंबन करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. यावर उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी अहवाल चुकीचा असल्याचे मान्य करत साहाय्यक निबंधक यांच्या निलंबनाची घोषणा केली.








