Vikas Thakre : बंडखोरांच्या पराभवानंतर विकास ठाकरेंनी जुना हिशोब केला पूर्ण

Sanjay Mahakalkar likely to be leader of opposition in NMC : संजय महाकाळकर पुन्हा विरोधी पक्षनेतेपदी येण्याची शक्यता

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या Nagpur Municipal Corporation निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला असून, काँग्रेसने सत्ताधारी भाजपला सभागृहात घेरण्यासाठी आपल्या अनुभवी शिलेदाराची निवड केली आहे. महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी आणि पर्यायाने विरोधी पक्षनेतेपदी संजय महाकाळकर यांची वर्णी लागणे आता जवळपास निश्चित झाले आहे.

२०१७ च्या कार्यकाळात अंतर्गत बंडखोरीमुळे ज्यांना अवघ्या १५ दिवसांत हे मानाचे पद गमवावे लागले होते, त्यांनाच पुन्हा संधी देऊन आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर काँग्रेसवरील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, यंदा जुन्या बंडखोर नेत्यांच्या पराभवामुळे महाकाळकर यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

Akola Municipal Corporation : भाजपकडून ठाकरे गटालाही ऑफर; पण सत्ता कुणाची?

निवडणूक निकालात भाजपने १०२ जागांसह निर्विवाद बहुमत मिळवले असले, तरी काँग्रेसने ३३ जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान टिकवून ठेवले आहे. मागील कार्यकाळात संजय महाकाळकर यांची गटनेतेपदी नियुक्ती होताच पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती आणि तत्कालीन ज्येष्ठ नगरसेवकांनी स्वतंत्र गटाची नोंदणी करून महाकाळकरांना पदावरून खाली खेचले होते. मात्र, आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे.

महाकाळकरांना विरोध करणारे तानाजी वनवे, प्रशांत धवड आणि सतीश होले यांसारखे दिग्गज नेते यंदा पराभूत झाले आहेत, तर दुसरीकडे प्रफुल्ल गुडधे आणि सतीश चतुर्वेदी यांसारख्या नेत्यांचा विरोधही आता मावळला आहे. अशा स्थितीत शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सूचवलेल्या नावावर पक्षात कोणतेही विरोधी सूर उमटण्याची शक्यता उरलेली नाही.

Mahayuti Government : जलसिंचनाचा खेळखंडोबा; २१०० कोटी पाण्यात!

काँग्रेसच्या विजयी नगरसेवकांमध्ये यंदा बहुतांश नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. या नव्या दमाच्या नगरसेवकांना जुन्या गटातटाच्या राजकारणापेक्षा विकास ठाकरे यांच्या नेतृत्वावर अधिक विश्वास असल्याने महाकाळकर यांची निवड बिनविरोध होण्याचे संकेत आहेत. येत्या मंगळवारी काँग्रेसच्या नगरसेवकांची अधिकृत बैठक होणार आहे. त्यामध्ये महाकाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल.

भाजपच्या ५४ महिला नगरसेविका आणि महाबलाढ्य संख्याबळासमोर सभागृहात पाय रोवून उभे राहण्याचे मोठे आव्हान आता महाकाळकर यांच्यासमोर असणार आहे. जुन्या अपमानाचा बदला आणि पक्षाची विखुरलेली ताकद एकत्र बांधून ठेवण्याच्या उद्देशानेच ठाकरे यांनी हा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळल्याचे बोलले जात आहे.