Congress leader questions to RBI : बँकिंग तज्ज्ञ, काँग्रेस नेते विश्वास उटगी यांचा अरबीआयला सवाल
Mumbai: रिझर्व्ह बँकेने नुकतेचनवीन पतधोरण जाहीर केले. यात रेपो दर 6 टक्क्यावरून थेट 5.5 टक्के म्हणजे, अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला. अनेक तज्ज्ञ फक्त पाव टक्क्याची कपात अपेक्षित धरत असतान आक्रमक भूमिका घेत अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला पण त्या मुळे ज्यांच्या खांद्यावर देश उभा आहे, त्यांच्याच खांद्यावर ओझं का? असा प्रश्न बॅंकिंग तज्ञ, काँग्रेस नेते विश्वास उटगी यांनी उपस्थित केला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, देशाचा जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के आहे. महागाई दर 4 टक्केच्या आत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पतधोरण सुलभ करून कर्जवाटप वाढविणे व उद्योगांना चालना देणे हे उद्दिष्ट स्पष्ट होते, असंही ते म्हणाले.
Harshwardhan Sapkal : भाजप म्हणजे नेते खाणारी चेटकीण, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका
त्याचवेळी कॅश रिझर्व्ह रेशो डिसेंबर 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने 4 टक्के वरून 3 टक्के करण्यात येणार आहे. ज्यामुळे बँकिंग प्रणालीमध्ये 2.5 लाख कोटी रुपये अतिरिक्त तरलता निर्माण होणार आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज आणि उद्योग कर्ज स्वस्त होतील. मात्र, एकीकडे बँका कर्जावरील व्याजदर कमी करणार असताना, दुसरीकडे त्या ठेवीवरील व्याजदरही मोठ्या प्रमाणात कपात करणार हे नक्की आहे. म्हणजेच बचत करणारा मध्यमवर्गीय, निवृत्त नागरिक आणि सामान्य ठेवीदार पुन्हा एकदा नुकसानात जाणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Rahul Gandhi: ठाण्यातील रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल!
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवी सुरक्षित मानल्या जातात, परंतु महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याजदर कपात ही ठेवीदारांची क्रयशक्ती कमी करते. हे निवृत्त नागरिक, मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक दरमहा मिळणाऱ्या व्याजावर अवलंबून असतात. बचत करणार्यांना दंडित करून अर्थव्यवस्था चालवायची ही नीती चुकीची आहे. रिझर्व्ह बँक व केंद्र सरकार ठेवीदारांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.








