Waiting for 12 more days for Somalwada Underpass Mahametro : संयम सुटल्याने नागरिकांनीच केले होते ‘उद्घाटन’
Nagpur Mahametro सोमलवाडा अंडरपास तयार झाला. पण छोटी छोटी कामे सुरूच आहेत. लोक वाटच बघत आहेत. एकाच अंडरपासवर संपूर्ण भार आला आहे. त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. अशात नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी सोमलवाडा अंडरपासचे अप्रत्यक्ष ‘उद्घाटन’ केले. पण त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. अशात महामेट्रोने १२ दिवस आणखी प्रतिक्षा करण्याचे आवाहन केले आहे.
सोमलवाडा आरयूबी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोने आखले होते. मात्र वाहतुकीच्या वर्दळीमुळे सर्विस रोडच्या कामाची गती कमी झाली. लोकांना त्रास होऊ नये यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूरकरांनो, १२ दिवस वाट बघा, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले.
Transgender Security : तृतीयपंथियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
महामेट्रोच्यावतीने सोमलवाडा येथील आरयूबीचे काम पूर्ण होऊनही मार्ग सुरू होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त करत उद्घाटनापूर्वीच रविवारी मार्गावरील वाहतूक सुरू केली होती. काही तास वाहतूक सुरू राहिल्यानंतर महामेट्रोकडून ही वाहतूक बंद करण्यात आली. नागरिकांनी पुन्हा वाहतूक सुरू करू नये यासाठी येथे सुरक्षारक्षकांना पहारा देण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये सोमलवाडा आरयूबीचे काम सूरू झाले होते. काम सुरू असताना काही काळासाठी या ठिकाणी रेल्वेचा वेग ताशी ४५ पर्यंत कमी करण्यात आला होता. ३२ कोटी रुपयांत हा प्रकल्प साकारण्यात आला. दोन पदरी असल्याने मनीषनगरकडे जाणाऱ्या आणि वर्धामार्गावर येणाऱ्यांसाठी हा सोईचा ठरेल. २२५ कामगारांनी हा पूल तयार केला. पादचारी मार्गही तयार केला असल्याने पायी चालणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
Akola BJP aggressive against Congress MLAs : भाजपचे पराभूत उमेदवारही न्यायालयात !
रहिवासी क्षेत्र असल्याने या ठिकाणी रात्रीचे काम सुरू ठेऊ शकत नाही. त्यामुळे दिवसा आणि त्यातही वाहतूक विस्कळीत होऊ नये याची खबरदारी घेतील जात असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.