व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola BJP aggressive against Congress MLAs : भाजपचे पराभूत उमेदवारही न्यायालयात !

Akola BJP aggressive against Congress MLAs : भाजपचे पराभूत उमेदवारही न्यायालयात !

Defeated candidate of BJP also in court Akola BJP aggressive against Congress MLAs : काँग्रेस आमदारांच्या विरोधात दंड थोपटले

Akola विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण निवडून आले. त्यांच्याविरुध्द भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३४ हजार ४०० मतदारांची नावे बनावट असल्याची तक्रार राज्य निवडणूक आयाेग व जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यानंतरही प्रशासनाने ठाेस कारवाई केली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण यांनी १ हजार २८३ मतांनी भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव केला हाेता. साजीद खान यांना ८८ हजार ७१८ मते तर भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांना ८७ हजार ४३५ मते मिळाली हाेती. मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वी विजय अग्रवाल यांनी आक्षेप घेतला होता. पश्चिम विधानसभा मतदारसंघांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीवर त्यांच्या आक्षेप होता. ३४ हजार ४०० मतदारांच्या नावांची वेगवेगळ्या ठिकाणी नाेंद असल्याचा दावा त्यांनी केला होता.

Akola Collector : राजकीय हेवेदावे ठरताहेत इमारतींच्या उद्घाटनातील खोडा

ही नावे यादीतून बाद करण्याची मागणी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे केली होती. अकाेला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली हाेती. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने ठाेस कारवाई केली नाही. असे विजय अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमुद केले आहे.

४७०० जणांची नावे, छायाचित्रात साधर्म्य

अकाेला पश्चिम मतदारसंघात ३ हजार ६०० व बाळापूर विधानसभा मतदारसंघात १ हजार १०० मतदारांची नावे एकसारखी आहेत. साेबतच त्यांची छायाचित्रेही एकसारखीच आहेत. अशा मतदारांचा शाेध घेऊन त्यांची यादी निवडणूक आयाेग व जिल्हा प्रशासनाकडे सादर केली हाेती. असा दावा विजय अग्रवाल यांनी केला.

Maharashtra Government : स्थिर सरकार, अस्थिर मंत्री !

काँग्रेसच्या विविध उमेदवारांविरुद्ध याचिका
माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यभरातील काँग्रेसच्या विविध उमेदवारांविरुद्ध माहायुतीच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली असल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप व महायुतीतील इतर पक्षांनी दंड थोपटले आहेत.

error: Content is protected !!