व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Wamanrao Chatap : २०२७ च्या पूर्वी विदर्भ राज्याची निर्मिती होणार! विदर्भातील खासदारांनो...

Wamanrao Chatap : २०२७ च्या पूर्वी विदर्भ राज्याची निर्मिती होणार! विदर्भातील खासदारांनो राजीनामे द्या

separate-vidarbha-state-will-be-formed-before-2027 : राजकीय पक्षांनी केली वैदर्भीयांची फसवणूक; भाजप-काँग्रेसच्या जुन्या आश्वासनांची विदर्भवाद्यांकडून आठवण.

Nagpur केंद्रात आणि राज्यात सत्ता अल्यानंतरच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. सोनिया गांधी यांनी तेलंगण निर्मितीच्यावेळी विदर्भाचाही विचार केला जाईल असा शब्द दिला होता. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वैदर्भीयांची फसवणूक केली. त्यामुळे विदर्भातील सर्व खासदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली. समितीचा संकल्प मेळावा पार पडला. यात डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ मिळवणारच असा दावा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केला.

स्वतंत्र विदर्भ राज्य ही काळाची गरज आहे. विदर्भापुढे गंभीर प्रश्न उभे असताना विदर्भातील सत्ताधारी पक्षाचे खासदार सत्ता असूनही विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळून देण्यात अपयशी ठरलेले आहे. विरोधी पक्षाचे खासदारही केंद्र सरकारला विदर्भ राज्य निर्माण करण्यास भाग पाडण्यात अपयशी ठरले आहे. म्हणून दहाही खासदारांनी आपले अपयश मान्य करून तत्काळ खासदार पदाची राजीनामे द्यावे अशी मागणी चटप यांनी केली. दरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने दरवर्षी मेळावा आयोजित केला जातो.

Sunil Kayande : चिखला-काकड प्रकरणी सत्य बाहेर आणा; निरपराधांवरील कारवाई थांबवा

प्रत्येक वेळी विदर्भ राज्य निर्मितीची तारीख जाहीर केली जाते. अभिरूप विधानसभाही भरविली जाते. पुढची विधानसभा स्वतंत्र विदर्भाची होईल असेही दावे केले जाते. पंधरा वर्षांपूर्वी विदर्भाचे आंदोलन चांगलेच तापले होते. त्यावेळी विदर्भवाद्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी सर्व उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले होते. सत्तेवर आल्यास विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल असे आश्वासन त्यावेळी भाजपच नेत्यांनी केले होते. प्रतिज्ञापत्र भरून देणाऱ्यांमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचासुद्धा समावेश होता.

Uday Samant : मतदारांनी काँग्रेसचे ‘कपडे’ आधीच फाडलेत; उद्योगमंत्र्यांची टीका

विरोधात असताना भाजप स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने होती. वारंवार आंदोलने करून त्यावेळच्या काँग्रेस आघाडीच्या सरकारला जाब विचारत होती. काँग्रेस सत्तेत असताना ज्येष्ठ नेते व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख, माजी केंद्रीयमंत्री स्व. वसंत साठे, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी. साळवे, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी या नेत्यांनीसुद्धा स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलने केली आहे.

रणजित देशमुख विधानसभेचे उमेदवार असताना त्यांनी मध्येच प्रचार बंद केला होता. जोपर्यंत विदर्भ राज्य निर्मितीचा शब्द दिला जात नाही तोवर प्रचार करणार नाही असे त्यांनी जाहीर केले करून खळबळ उडवून दिली होती. शेवटी सोनिया गांधी यांनी त्यांना फॅक्स पाठवला. तेलंगण राज्याची निर्मिती करताना विदर्भाच्या मागणीची दखल घेतली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले होते.

error: Content is protected !!