Breaking

Wardha Administration : वाळूचे ट्रॅक्टर तर दिसले, मग अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही?

No action was taken against those involved in illegal sand mining : प्रशासनाच्या भूमिकेवर संशय; नदी पात्रातून अवैध उपसा

Wardha : एका ठिकाणी वाळूचा अवैध उपसा सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळते. अधिकारी घटनास्थळी पोहोचतात. त्यांच्यापुढे वाळू भरलेले ट्रॅक्टर उभे असतात. अधिकारी उघड्या डोळ्यांनी ट्रक बघतात. पण काहीच न दिसल्यासारखे करत ते परत येतात. या एकूणच घटनाक्रमामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

Deoli तालुक्यातून वाहणाऱ्या यशोदा नदीपात्रातून वायगाव (निपाणी) येथील वाळू चोरटे बेसुमार वाळू उपसा करीत आहेत. याची माहिती मिळताच देवळीच्या महसूल विभागाचे अधिकारी नदीपात्रात पोहोचले. तीन ट्रॅक्टर असतानाही कारवाई न करतात माघारी फिरल्याने हा सर्व प्रकार पाहून प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी तोंडात बोट टाकले. इतकेच नाही तर वाळू चोरट्याशी साठगाठ करून वाहने सोडल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

Prataprao Jadhav, Ravikant Tupkar : सगळे म्हणतात आम्हीच सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न!

वायगावातील चार ते पाच वाळू चोरट्यांचं एक टोळकं असून सातत्याने ते सोनेगाव (बाई) येथून वाहणाऱ्या यशोदा नदीतून वारेमाप वाळू उपसा करीत आहेत. दररोज हा प्रकार सुरु असल्याने पोलिसांसह महसूल विभागाचाही त्यांना आशीर्वाद आहे. हे यापूर्वीच्या कारवाईवरून दिसून आले. आताही वाळू वाहतूक सुरू असताना खासगी वाहनातून अधिकारी पोहोचले. पण तीन ट्रॅक्टर डोळ्यासमाेर असताना कारवाई न करताच सोडून दिल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Belora Airport : अमरावती विमानतळावर प्रथमच एटीआर-७२ चाचणी

वायगावातील मोहननामक व्यक्तीचे हे ट्रॅक्टर असल्याचेही बोलले जात आहे; पण अधिकाऱ्यांनीच हात वर केल्याने या वाळू चोरट्यांवर अंकुश कसा लागणार, असाही प्रश्न विचारला जात आहे. देवळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत आहे. यामध्ये वाळू उपसाही जोरात आहे; परंतु अधिकारी पोहोचताच वाळू चोरटे पसार होत असल्याचे दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.