Water Crisis : पाणी असूनही पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Women’s march to the Dusrabid Gram Panchayat office : दुसरबीड ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा आक्रोश मोर्चा!

Dusarbid ग्रामपंचायत अंतर्गत पाणी उपलब्ध असतानाही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

दुसरबीड ही तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून, सध्या मुबलक पाणी उपलब्ध असतानाही अनेक भागांत पाणीपुरवठा अनियमित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असून, पिण्याचे पाणी तर दूरच, दैनंदिन वापरासाठीही पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. विशेषतः वार्ड क्रमांक १ व २ मध्ये गेल्या चार महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Mahayuti Government : योजनाच ठरतायत ‘निराधार’, लाभापासून हजारो वंचित

या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे पाठपुरावा केला; मात्र कोणताही ठोस उपाय करण्यात आला नाही. अखेर संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. मात्र मोर्चाच्या वेळी सरपंच व सचिव गैरहजर असल्याने महिलांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, ग्रामपंचायतीची जुनी पाणीपुरवठा योजना सध्या कार्यरत असली तरी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने काही ठिकाणी पाइपलाइन तोडल्याने ती अद्याप जोडलेली नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे काही भागांत पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे.

Vidarbha Farmers : शेतकरी पुत्राची आत्महत्या; मेरा खुर्द येथील घटना

या प्रकरणी ग्रामसेवक अशोक गुरुकुल यांनी माहिती देत पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार, हा प्रश्न अजूनही ग्रामस्थांसाठी अनुत्तरितच आहे.