Water department : पाणीपट्टी त्रुटींविरोधात आंदोलनाचा Impact; संयुक्त बैठक होणार

Impact of the protest against water tariff errors : मुंबईत नोंदवला निषेध; नगर विकास विभागाच्या अवर सचिवांना निवेदन

Akola अकोला महापालिकेच्या पाणीपट्टी देयकांमधील त्रुटींविरोधात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते नीलेश देव यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडले. त्यांच्या मागण्यांची दखल घेत नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी मध्यस्थी केली आणि आंदोलनाची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला.

सोमवार, १७ मार्चपासून सुरू असलेल्या या आंदोलनात अकोल्यातील नागरिकांवर अन्यायकारक पाणीपट्टी कर लादल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनादरम्यान नीलेश देव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले, मात्र त्यानंतर त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली.

Uddhavsaheb Balasaheb Thackeray Shivsena : सोयाबीन खरेदीत अनियमितता; शेतकरी अजूनही प्रतीक्षेत!

नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यानंतर, अकोला महापालिका आयुक्त सुनील लहाने यांच्याशी थेट संपर्क साधून पाणीपट्टी देयके आणि मीटर रीडिंगमधील तांत्रिक त्रुटींची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

या आंदोलनामुळे शासनाने अकोला महापालिकेतील त्रुटींकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत आहेत. यासोबतच, अकोला आमदार साजीद खान पठाण यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आहे.

Nandgaon Khandeshwar Police : पाच हजार रुपयांची लाच मागितली, पोलीस उपनिरीक्षकाला अटक!

या पार्श्वभूमीवर गुरुवार, २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता अकोल्यात महापालिका आयुक्त आणि नीलेश देव यांच्यात संयुक्त बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर अकोल्यातील नागरिकांना न्याय मिळेल की नाही, यावर पुढील दिशा ठरेल, अशी चर्चा अकोला आणि मुंबईतील राजकीय वर्तुळात सुरू आहे.