rare-minerals-discovered-western-coalfield-limited : वेकोलीच्या हाती लागला खजाना, नागपूर जिल्ह्यातील दोन खाणींचा समावेश
Nagpur विदर्भात मोठ्या प्रमाणात खनिजाचे साठे असल्याचा दावा अनेक वर्षांपासून केला जात होता. यात प्रमुख्याने कोळशाचा समावेश होता. मात्र आता कोळशासह अनेक महत्त्वाचे खनिजे असल्याचे समोर आले आहे. अलीकडेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडला संशोधनात नागपूरसह खुल्या खाणींमध्ये मोठा खजाना हाती लागला आहे. महाराष्ट्रातील सहा कोळसा खाणींमध्ये आठ महत्त्वपूर्ण धोरणात्मक खनिजे आढळली आहेत. यातील दोन खाणी नागपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नागपूर जिल्ह्यातील आदासा, मकरधोकडा तसेच दुर्गापूर खुली खाण, गौरी-पॉनी, मुंगोली-निरगुडा आणि येकोना या खाणींमध्ये पोटॅश, टेल्युरियम, टायटॅनियम, लॅन्थॅनम, सिरियम, रेनियम, सेलेनियम आणि झिरकोनियम या खनिजांचे साठे सापडले आहेत. पोटॅश हे खते आणि कृषी-रसायनांसाठी उपयुक्त समजले जातात. टेल्युरियममध्ये सोलर फोटोव्होल्टेइक सेल्स, सेमीकंडक्टर्स आणि थर्मोइलेक्ट्रिक उपकरणांसाठी आवश्यक घटक असतात.
Chandrashekhar bawankule : होळीच्या दिवशी भूमिहीन शेतकरी करणार महसूलमंत्र्यांच्या घरासमोर शिमगा
टायटॅनियमचा वापर एरोस्पेस, संरक्षण आणि प्रगत मिश्र धातूंसाठी केला जातो. लॅन्थॅनम आणि सिरियम हे इलेक्ट्रिक वाहने, कायमस्वरूपी चुंबक, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॅटॅलिस्टसाठी महत्त्वाचे असते. रेनियम जेट इंजिन आणि संरक्षण क्षेत्रातील सुपरअलॉयसाठी मौल्यवान समजले जातात. सेलेनियमचा वापर हा काच निर्मिती आणि अक्षय ऊर्जेसाठी केला जातो. झिरकोनियम अणू ऊर्जा, सिरॅमिक्स आणि एरोस्पेससाठी आवश्यक असतो.
या संशोधनातून असे दिसून आले आहे की, खाणींमधील ‘ओव्हरबर्डन’ (खडक किंवा मातीचा थर) आणि कोळसा काढल्यानंतर उरलेला कचरा यामध्ये ही उच्च दर्जाची खनिजे दडलेली आहेत. यामुळे खाणकामातील टाकाऊ पदार्थांचे रूपांतर आता महसूल देणाऱ्या संसाधनांमध्ये होणार आहे. या शोधामुळे डब्ल्यूसीएलसाठी कोळशाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात वैविध्य आणण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. यामुळे खाणींचे अर्थशास्त्र सुधारेल आणि भविष्यात थर्मल कोळशावरील अवलंबित्व कमी होईल, वेकोलीच्या असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
Raj Thackeray : ‘एफआयआरला सरकार का घाबरतंय?’ सरकारी भूमिकेमुळे संशय वाढतोय !
या सर्व खनिजाचे नमुने हैदराबाद येथील ‘नॉन-फेरस मटेरियल्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटरकडे पुढील तांत्रिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कोल इंडिया लिमिटेड आणि एनएफटीडीसी यांच्यात या खनिजांच्या उत्खननासाठी आणि प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. डब्ल्यूसीएल आता या खनिजांचे उत्खनन करण्यासाठी पायलट प्लांट आणि व्यावसायिक युनिट्स उभारण्यावर भर देणार आहे.








