व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र West bengal politics : सुवेंदु अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमुळे बंगाल हादरला!

West bengal politics : सुवेंदु अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमुळे बंगाल हादरला!

suvendu-adhikari-pa-chandranath-murder-pakistan-bangladesh-connection-west-bengal-politics : पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शनच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

New Delhi : पश्चिम बंगालमधील राजकारण पुन्हा हिंसाचाराच्या आरोपांनी तापले आहे. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून या हत्येमागे पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन असल्याच्या दाव्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. भाजपने या घटनेमागे तृणमूल काँग्रेसशी संबंधित घटकांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर तृणमूल काँग्रेसने अधिकृत निवेदन जारी करत या हत्येचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ हे आपल्या वाहनातून घरी परतत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार ओव्हरटेक करून अडवली. त्यानंतर जवळून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चंद्रनाथ यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या झाडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या हत्येमध्ये ऑस्ट्रिया निर्मित ग्लॉक G43x या अत्याधुनिक सेमी ऑटोमॅटिक पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या काडतुसांच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी या शस्त्राची ओळख पटवली. ग्लॉक G43x हे अत्यंत महागडे आणि अत्याधुनिक पिस्तूल मानले जाते. भारतात या प्रकारच्या शस्त्रांची अधिकृत विक्री मर्यादित असल्याने सामान्य गुन्हेगारांकडे अशी शस्त्रे पोहोचणे कठीण मानले जाते. त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा वापर झाल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Sanghatan Srujan Abhiyan : संघटन सृजन अभियानानंतरही नेतृत्व निवडीला विलंब

सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत पाकिस्तानमार्गे विविध विदेशी बनावटीची शस्त्रे भारतात तस्करीद्वारे आणली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः पश्चिम बंगाल आणि सीमावर्ती भागांमध्ये बांगलादेशमार्गे शस्त्र पुरवठ्याचे जाळे सक्रिय असल्याची माहिती तपास यंत्रणांकडे आहे. चंद्रनाथ यांच्या हत्येत वापरण्यात आलेले ग्लॉक पिस्तूलही पाकिस्तानातून बांगलादेशात आणि तेथून पश्चिम बंगालमध्ये आणण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी भारत-पाकिस्तान सीमेजवळ कारवाई करताना विदेशी बनावटीची अनेक पिस्तुले जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये तुर्की बनावटीची जिगाना पिस्तुले, अमेरिकन बेरेटा आणि ऑस्ट्रियातील ग्लॉक मालिकेतील शस्त्रांचा समावेश होता. या कारवाईनंतर सीमापार शस्त्र तस्करीचे मोठे नेटवर्क सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता चंद्रनाथ हत्या प्रकरणामुळे या संशयाला आणखी बळ मिळाले आहे.

Bacchu Kadu : सरकारविरोधात भूमिका मांडणारेच सरकारमध्ये बसतील तर आम्ही काय करायचे?

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याची चर्चा सुरू आहे. सुवेंदु अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील भाजपचे आक्रमक चेहरे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयाच्या हत्येमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास विविध सुरक्षा यंत्रणांकडून सुरू असून हल्ल्यामागील मास्टरमाईंडचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

error: Content is protected !!