Wet drought : अतिवृष्टीचा तडाखा, २,२१५ कोटींची मदत मिळणार !

Chief Minister Fadnavis announcement to provide relief to farmers : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Mumbai : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ९७५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून हा सरासरीपेक्षा तब्बल १०२ टक्के अधिक पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. “आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटी रुपयांच्या मदतीचे जीआर काढले आहेत. यापैकी १,८२९ कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये पोहोचले असून नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. उर्वरित मदतही आठ ते दहा दिवसांत पोहोचेल,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस यांनी सांगितले की, “मराठवाड्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. बीड, धाराशिव परिसरात रेस्क्यू ऑपरेशन्स सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यात २७ जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले असून २०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.” आतापर्यंत अहिल्यानगर, बीड, परभणी, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. मदतकार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात आहेत.

CM assurance : ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, तुम्ही मागणी करा, शक्य तेवढं देत जाऊ

“नुकसानीचे पंचनामे झाल्यावर एकत्रित मदत करण्याऐवजी जसे पंचनामे होतील तशी तातडीने मदत करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे सध्या एखाद्या जिल्ह्यात मदतीचे प्रमाण कमी वाटले तरी नंतर ते वाढेल. तालुक्याचा अहवाल लवकर मिळाला तर मदत तत्काळ केली जाईल,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, मृत्यू, जनावरे वा घरांचे नुकसान यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित मदत करण्याचे अधिकार दिले आहेत.

Government Contractors’ Bills : शासकीय कंत्राटदारांची बिले लवकरच मिळणार !

राज्यात “ओला दुष्काळ” जाहीर करण्याची मागणी विरोधक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “खरडून गेलेल्या जमिनींसाठी मदतीचे नियम आहेत. त्या निकषांमध्ये बदल करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळेल, पण तोपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही.”

CMs statement : अनेकांना वाटलं माझी राख होईल, पण मी…

 

मंत्रिमंडळ बैठकीत सर्व जिल्ह्यांतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. “उद्या सर्व पालकमंत्री पूरग्रस्त भागांना भेट देतील. मी स्वतःही काही भागांना भेट देणार आहे. मदतकार्य सुरळीत सुरू राहावे यासाठी दौरे केले जातील,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

_____