Where is mosque : हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा-मशिदी मागे का?

BJP questions help for heavy rain victims : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवरून भाजपचा सवाल

Mumbai : महाराष्ट्रावर अतिवृष्टी आणि महापुराचं संकट कोसळलं असून लाखो कुटुंबे अन्न, पाणी आणि निवाऱ्याविना अडकून पडली आहेत. अशा वेळी हिंदू धर्मातील अनेक प्रमुख मंदिरांनी पुढाकार घेत कोट्यवधी रुपयांची मदत सरकारकडे पारदर्शकपणे दिली असून, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि सेवाकार्य सुरू केल्याचं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं आहे. मात्र, राज्यातील अन्य धर्मीय प्रार्थनास्थळं — दर्गा-मशिदी कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तुळजाभवानी मंदिर, शेगाव गजानन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर आदी संस्थांनी सरकारकडे कोट्यवधींची मदत सुपूर्द केली. तसेच अनेक मंदिर ट्रस्ट, सार्वजनिक मंडळांनी पूरग्रस्तांपर्यंत अन्न, निधी आणि आवश्यक वस्तू पोहोचवल्या. यामुळे संकटाच्या काळात मंदिरांनी दाखवलेली माणुसकी अधोरेखित झाली असल्याचं उपाध्ये म्हणाले.

Ground shook : तीन गावात भूगर्भातून पाच वेळा मोठा आवाज !

उपाध्ये यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत विचारलं की, दर्गा-मशिदींच्या व्यवस्थापनाकडे देखील कोट्यवधींचा निधी असतानाही, पूरग्रस्तांसाठी ठोस मदतीची घोषणा का नाही? पारदर्शक निधी माहिती का नाही? “कधी खोट्या हिंदुत्वाचा आरोप करणारे, तर कधी गंगाजमनी तहजीबचं प्रेम दाखवणारे नेते आणि विचारवंत आता स्वतःला प्रश्न विचारतील का?” असं ते म्हणाले. “हा प्रश्न हिंदू-मुस्लिमचा नसून संवेदनशीलतेचा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Teachers’ constituency : शिक्षक मतदारसंघासाठी चुरस; आजपासून मतदार नोंदणी

दरम्यान, महापुराच्या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे गटालाही लक्ष्य केलं आहे. केशव उपाध्ये यांनी पोस्ट करत म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी येऊ घातलेला दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च पूरग्रस्तांना द्यावा. “मुख्यमंत्री असताना कृती केली नाही, आता तरी प्रायश्चित्त घ्या. ‘गद्दार-मिंधे’च्या गजरापेक्षा मदत महत्त्वाची आहे,” अशी टीका उपाध्ये यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील विचारप्रधान दसरा मेळाव्याऐवजी आजचा मेळावा फक्त थयथयाट आणि खर्चिक सोहळा बनल्याची टीकाही त्यांनी केली.