Winds of defection : भाजप प्रवेशासाठी संजोग वाघेरे मुंबईकडे रवाना

Explained the reason behind leaving Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागचं स्पष्ट केलं कारण

Pimpri Chinchwad : शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती मुंबईत हा पक्षप्रवेश होणार असून त्यासाठी संजोग वाघेरे सकाळी पिंपरी चिंचवडमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या सोबत अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा वाघेरेंनी केला आहे.

संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा निवडणूक शिवसेना ठाकरे गटाकडून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना सुमारे सहा लाख मते मिळाली होती, मात्र शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांतच वाघेरेंनी 18 डिसेंबर रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.

Nagar Parishad election : राज्यातील नगरपरिषद निवडणुकांत ईव्हीएमचा खोळंबा!

भाजप प्रवेशापूर्वी भावना व्यक्त करताना संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर कायम असल्याचं स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर विश्वास ठेवून लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मनात कोणतीही कटुता नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र पिंपरी चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढते प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं वाघेरेंनी स्पष्ट केलं.

भाजपसोबत राहिल्यास शहराचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे या प्रभाग क्रमांक 21 मधून भाजपच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रभाग 21 मधील भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम, मात्र अटक टळली

मात्र ही नाराजी पक्षाचे वरिष्ठ नेते नक्कीच दूर करतील, असा विश्वास वाघेरेंनी व्यक्त केला आहे. भविष्यात पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी किंवा मुलगा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील अनुभवी नेतृत्व मानले जातात. दिवंगत माजी महापौर भिकू वाघेरे यांचे ते पुत्र असून संजोग वाघेरे तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी महापौरपद भूषवले असून स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.

kidney sale case : कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहाराची होणार सखोल चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग आठ वर्षे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती आणि शरद पवार तसेच अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून हे कुटुंब ओळखलं जात होतं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता, मात्र आता पुन्हा मोठा राजकीय निर्णय घेत त्यांनी भाजपची वाट धरली आहे.

या पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक मोठा धक्का मानला जात असून आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.