Chief Minister Devendra Fadnavis’ warning to Abhimanyu Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अभिमन्यू पवारांना इशारा
Nagpur : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यात शाब्दिक वाद चिघळलेला पाहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेचा वारंवार उल्लेख केल्यामुळे संतप्त झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी थेट सर्वांसमोर पवारांना सुनावत “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावं लागेल” असा इशारा दिला.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे मिळालेला प्रचंड जनसमर्थनाचा फायदा अजूनही चर्चेत आहे. त्यामुळे महिला कल्याणाशी संबंधित कोणताही विषय उपस्थित झाला की चर्चा आपोआप या योजनेकडेच वळते. आजही तशीच परिस्थिती निर्माण झाली. अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील अवैध दारुविक्रीचा मुद्दा मांडताना पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला.
Winter Session : आपला दवाखाना भ्रष्टाचाराचं कुरण? दवाखान्याच्या जागी साडीचं दुकान!
“आमच्या लाडक्या बहिणींना अवैध दारूच्या व्यवसायाचा सर्वाधिक त्रास आहे. महिला रोज याबाबत तक्रारी करतात. हे त्यांच्या दु:खाचं कारण आहे” असे पवार यांनी विधानसभेत सांगितले. त्यांनी पुढे आरोप केला की विधानसभा अध्यक्षांनी कारवाईसाठी दिलेले निर्देश गृह विभाग आणि अन्न-औषध प्रशासनाने पाळले नाहीत.
याच वक्तव्यानंतर फडणवीस अचानक आक्रमक झाले. पवारांचे बोलणे तोडत त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले “अध्यक्ष महोदय, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल. योजना सुरूच राहील. तिची कोणत्याही योजनेशी तुलना करता येणार नाही.” यासोबतच फडणवीसांनी सांगितले की विधानसभा अध्यक्षांनी दिलेले निर्देश प्रत्यक्षात अंमलात आले नसतील तर कारवाई तातडीने केली जाईल.
Winter Session : आपला दवाखाना भ्रष्टाचाराचं कुरण? दवाखान्याच्या जागी साडीचं दुकान!
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आज सभागृहातच सत्ताधारी सदस्यांमध्ये तणाव निर्माण झाला. फडणवीसांची थेट चेतावणी मिळाल्यानंतर पवारांनी शांत भूमिका घेतली. मात्र या घटना घडल्याने विधानसभेतील वातावरण काही काळ तंग झाल्याचे पाहायला मिळाले.
—








