Winter session : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात खळबळजनक उलगडा

Physical abuse by police officer Badne, Chief Minister informed in House : पोलीस अधिकारी बदनेकडून शारीरिक शोषण, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

Nagpur : फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात आज हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक माहिती सभागृहात मांडली. महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर या घटनेने राज्यभरात प्रचंड संताप आणि दु:खाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणातील तपासाबाबत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी बदनेने डॉक्टर महिलेची फसवणूक करत तिचे शारीरिक शोषण केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आत्महत्येनंतर सुरू केलेल्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली असून न्यायिक समितीद्वारे स्वतंत्र चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाला असून त्या रिपोर्टनुसार डॉक्टर महिलेने हातावर लिहिलेली अक्षरे तिचीच असल्याची खात्री झाली आहे. या प्रकरणात आरोपींनी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, उपलब्ध चॅट्स आणि माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी बदनेने डॉक्टर महिलेची फसवणूक करत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले आहे.

Local body elections : मालमत्ता करवाढीचा अधिकार महापालिकेचा; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

फडणवीस पुढे म्हणाले की, बदनेने सुरुवातीला लग्नाच्या आमिषाची भूमिका घेतली, परंतु नंतर पूर्णपणे वेगळी भूमिका घेत डॉक्टर महिलेचा गैरवापर झाल्याचे तपासात दिसून आले आहे. याशिवाय आरोपींच्या अटकेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्राच्या प्रक्रियेदरम्यान अनेक अनियमितता झाल्याचाही खुलासा झाला असून महिला डॉक्टरने काही गुन्हेगारांना ‘अनफिट’ प्रमाणपत्र दिल्याचे रिपोर्ट मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या वरिष्ठांना यासंदर्भात पत्रदेखील लिहिले होते. ही घटना सुमारे पाच महिन्यांपूर्वीची असल्याचेही त्यांनी सांगितले.

Local body elections:प्रारूप मतदार यादीला अंतिम रूप; १० डिसेंबर रोजी होणार प्रसिद्ध

महिला डॉक्टरच्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, तपासात दोन्ही आरोपींची नावे स्पष्टपणे समोर आली असून त्या दोघांची नावे लिहून डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचे तपासात सिद्ध होत आहे. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार मृत्यू गळफासामुळे झाल्याची पुष्टी झाली असून हातावर लिहिलेली अक्षरेही डॉक्टर महिलेचीच आहेत. तपास अजूनही सुरू असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी न्यायाधीशामार्फत सुरू असून पोलिस तपासही महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडूनच चालवला जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.