guardian-minister-bawankule-announces-1 lakh-fund-to-1500-bachat-gats-amravati : पालकमंत्र्यांची घोषणा, बिनव्याजी कर्जामुळे मिळेल आर्थिक भार कमी
Amravati अमरावती जिल्ह्यातील सुमारे दीड हजार महिला बचतगटांना प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार असून एकूण दीड कोटी रुपयांची मदत दिली जाईल. यासोबतच व्यवसायवाढीसाठी बँकांमार्फत पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) मार्फत अमरावतीतील सायंस्कोर मैदानावर गेल्या चार दिवसांपासून महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनी-विक्रीचे उद्घाटन पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
Shivsena UBT : शिवसेना शहरप्रमुखाच्या हत्येचा कट?, परिसरात संशयास्पद हालचाली
या कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभाताई खोडके, रवी राणा, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, गजानन लवटे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख तसेच माविमचे संचालक रंजन वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Ajit Pawar death : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात, सत्य लवकरच बाहेर येईल
पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, सूर्यघर योजनेअंतर्गत सौरऊर्जेचा वापर केल्यास महिलांना पुढील १५ वर्षे वीज बिल भरण्याची गरज भासणार नाही. तसेच तुकडेबंदी कायद्यांतर्गत जिल्ह्यात एक लाख घरांचे पट्टेवाटप करण्यात येणार आहे. महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Sudhir mungantiwar : धारदार आयुधांचा ‘अनुभवी’ वापर आणि आ.सुधीर मुनगंटीवार यांची धडाकेबाज मांडणी
सध्या अमरावती जिल्ह्यात सुमारे २ लाख २० हजार महिला बचतगटांमध्ये सहभागी आहेत. ही संख्या आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण, एकल महिलांसाठी उपयुक्त पुस्तकांचे विमोचन तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले.








