‘Zero Mile’, the focal point of a united India, will be the center of attraction said CM Devendra Fadanvis : नागपूर महानगरपालिका करणार देखभाल व दुरूस्ती
Nagpur : नागपुरातील झिरो माईल हा भारत देशाचा केंद्रबिंदू आहे. ‘झिरो माईल स्टोन’ येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यांनी येथे थांबले पाहिजे, याची माहिती जाणून घेतली पाहिजे, यासाठी या परिसराचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. अखंड भारताचा केंद्रबिंदू झिरो माईल आकर्षणाचे केंद्र ठरला पाहिजे, असा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कामांबाबत नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व संबंधिक विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
School buses : विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षीत प्रवास, अनधिकृत स्कूल बसेसवर कारवाईचा बडगा !
नागपूरचा चौफेर विकास करण्यासाठी जे आराखडे आखण्यात आले आणि नियोजन करण्यात आले, त्याप्रमाणे तत्काळ सर्व कामे सुरू झाली पाहिजे, ऑरेंज सीटी स्ट्रीट प्रकल्पात परफॉर्मन्स गॅलरी, झिरो माईल सुशोभीकरण, कॉटन मार्केटचा विकास, फुल मार्केट, कारागृह स्थलांतरण ही सर्व कामे महानगराच्या विकासाला बळकट करणारी आहेत. त्यामुळे ही कामे तत्काळ सुरू करून पूर्ण करावी, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
India – Pakistan War : युद्धजन्य परिस्थितीत प्रत्येकाने घ्यावे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे !
झिरो माईल परिसरातील जागा राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. येथे अखंड भारत कसा होता? त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर केंद्रस्थानी कसे आले, याबाबतचा इतिहास दर्शवणारे एक्सपिरियन्स सेंटर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. एकूण ४५ कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून संग्रहालय, आवश्यक सोयी सुविधा आणि वाहनतळ तयार करण्यात येईल आणि भविष्यात महानगरपालिकेकडून याची देखभाल दुरूस्ती केली जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.