Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुका लांबल्याने इच्छुकांना ‘विश्रांती’

aspirants on rest as the Zilla Parishad elections are delayed : उमेदवारीच्या शर्यतीला तात्पुरता ब्रेक; राजकीय हालचाली मंदावल्या

Chikhli जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागण्याचे संकेत मिळताच चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. इच्छुकांनी संभाव्य मतदारसंघांचा अभ्यास सुरू करून जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला होता. अनेकांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा सूर लावत मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. मात्र निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्याने या सर्व धावपळीला सध्या ब्रेक लागला आहे.

‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकासाचा कणा असलेली पंचायत समिती या दोन्ही संस्था गेल्या आठ वर्षांपासून लोकप्रतिनिधींविना आहेत. निवडणुका रखडल्याने अनेक विकासकामे खोळंबली असून सध्या अधिकाऱ्यांकडेच सर्व कारभार असल्याची स्थिती आहे.

Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांच्या हितासाठी मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

निवडणूक समीप येताच इच्छुकांची ‘दारं’ उघडतात, हे लक्षात घेऊन गावपातळीवर विविध उत्सव, धार्मिक कार्यक्रम, जयंती आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. इच्छुकांनीही देणग्यांच्या माध्यमातून मोठी आर्थिक गुंतवणूक केली. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने त्यांना धक्का बसला आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या दोन्ही गटांना आगामी निवडणुकांत विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आरक्षणाचा मुद्दा अद्यापही निकाली न निघाल्याने संभाव्य मतदारसंघ ‘फिक्स’ नसल्याची स्थिती आहे.

Nagpur Municipal corporation : काँग्रेस रविवारी ठरवणार स्वीकृत सदस्यांची दोन नावे; पराभूत उमेदवारांना ‘नो एंट्री’

सतत मतदारसंघात फिरणारे इच्छुक सध्या मात्र शांत दिसत आहेत. “निवडणूक तारीख जाहीर होईपर्यंत घरीच बसायचे,” अशी भूमिका काहींनी घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात तात्पुरती शांतता असली तरी निवडणूक जाहीर होताच पुन्हा एकदा धावपळ सुरू होणार, हे निश्चित मानले जात आहे.