Who will get benefit from the increased polling stations? : अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीचे तयारी जोमात
Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची हालचाल गतीमान झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या १८०० वरून १८९० वर नेण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर १००० ते ११०० मतदारांची जोडणी आयोगाने बंधनकारक केली असून, त्यानुसार केंद्रांचे पुनर्निर्माण व पुनर्रचना करण्यात आली आहे. या वाढलेल्या मतदान केंद्राचा फायदा आता नेमका कोणाला होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता असल्याने जिल्हा निवडणूक विभाग आवश्यक सुविधा आणि यंत्रणांची तयारी करत आहे. प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण झाली असून, मतदान यंत्रांच्या मागणीची नोंदही करण्यात आली आहे.
Heavy rainfall : पावसाने मारले सरकारने तारले; ५६६ कोटी मंजूर!
आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरील मतदारसंख्येची मर्यादा निश्चित केली आहे. पूर्वी एका केंद्रावर ८०० ते ९०० मतदार जोडले जात होते, परंतु नव्या निर्देशानुसार ही संख्या १००० ते ११०० करण्यात आली आहे. यामुळे ९० अतिरिक्त मतदान केंद्रांची वाढ झाली आहे.
१८९० केंद्रांसाठी २०८५ कंट्रोल युनिट (सीयू) व ४१७० बॅलेट युनिट (बीयू) आवश्यक आहेत. १० टक्के प्रमाणे सीयू व अडीच टक्क्यांप्रमाणे बीयू राखीव ठेवण्याच्या सूचनांनुसार प्रशासनाने मागणी आयोगाकडे नोंदविली असून यात बदल होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील केंद्रस्थिती
मागील निवडणुकीतील केंद्रे : १८००
यावेळची केंद्रसंख्या : १८९०
पंचायत समिती गण : ११८
जिल्हा परिषद गट : ५८
Maharashtra Cabinet : ‘त्या’ जागांची मालकी महानगरपालिकेचीच, मंत्रिमंडळाचा निर्णय
गण-गटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा
२० ऑगस्ट रोजी ग्रामविकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार एससी व एसटी गटात लोकसंख्येच्या प्रमाणात चक्रीय आरक्षण होणार आहे, तर नामनिर्देशित व सर्वसाधारण गटांसाठी सोडत काढली जाणार आहे. मात्र अद्याप गण-गटांचे आरक्षण निश्चित झालेले नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार प्रतीक्षेत असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतरच राजकीय हालचालींना वेग येणार आहे.








