Zilla Parishad Elections : चिखलीत ‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपची तटबंदी; ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता!

chikhli-bjp-operation-lotus-strategy-congress-workers-entry : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांची उलथापालथ; महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षांतराचा धडाका

Chikhli बुलढाणा जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपने आपली रणनीती आक्रमक केली असून, येथे ‘ऑपरेशन लोटस’ सक्रीय झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपने आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला असून, काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू झाले आहेत.

चिखली नगरपालिकेत सत्ता काबीज केल्यानंतर भाजपच्या गोटात प्रचंड उत्साह आहे. आता हेच यश जिल्हा परिषदेत मिळवण्यासाठी पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रायपूर, पिंपळगाव सराई आणि सैलानी हा परिसर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, येथील काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असून, त्यांच्या प्रवेशासाठी भाजपने वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. जिल्ह्यात एका बाजूला शिंदेसेनेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला असताना, आता भाजपनेही चिखलीत आपले ‘ऑपरेशन लोटस’ प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे.

Chandrapur Municipal Corporation : नगरसेवक सांभाळता आले नाहीत; अंतर्गत गोंधळानेच चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा खेळ खल्लास

नुकताच चिखलीत पार पडलेला पक्षांतराचा सोहळा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्षम कार्यकर्त्यांची फळी असणे आवश्यक असते. भाजपने काँग्रेसमधील नाराजांना संधी देत आपली फळी मजबूत करण्याचे काम हाती घेतले आहे. चिखलीतील भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने गेल्या काही महिन्यांत जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे, ज्याचा परिणाम आता पक्षविस्तारात दिसून येत आहे.

https://sattavedh.com/nagpur-municipal-corporation-nagpur-municipal-corporation-standing-committee-appointment-delay-bjp-congres

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. चिखली मतदारसंघातील आपले वर्चस्व टिकवण्यासाठी काँग्रेसला आता नवीन रणनीती आखावी लागणार आहे. दुसरीकडे, भाजपने या ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून विरोधकांची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे दूरगामी परिणाम उमटण्याची शक्यता आहे.