Zilla Parishad elections : आधीच खर्चाचा धडाका; प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार?

Political parties geared up for campaign : जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी इच्छुकांची तयारी, गावागावांत राजकीय हालचालींना वेग

Buldhana जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी काळात होण्याची शक्यता लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना जोर चढला आहे. निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी तयारीला वेग दिला असून, गावागावांत संभाव्य उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात असून, नुकत्याच साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काही इच्छुकांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी भरघोस बक्षिसांचे वाटप केले, तर काहींनी शाळा व सार्वजनिक संस्थांना देणग्या दिल्या. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली प्रतिमा उजळवणे आणि स्थानिक पातळीवर संपर्क वाढवणे, यावर इच्छुकांचा भर दिसून येत आहे.

Vidarbha Farmers : प्रशासन गप्प, शेतकरी आक्रमक! सोलर कंपनीच्या अतिक्रमणाविरोधात शेतकऱ्यांचा ठिय्या

निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले

अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच ग्रामीण भागात राजकीय हालचाली वाढल्याने वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्वच इच्छुक निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, येत्या काळात राजकीय चुरस अधिक वाढण्याची शक्यता आहे.

सरपंचपदाच्या आरक्षणानंतर इच्छुकांची संख्या वाढली

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. आरक्षणामुळे संधी निर्माण झाल्याने नव्या चेहऱ्यांनी पुढाकार घेतला असून, विविध सामाजिक गटांकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली आहे. परिणामी ग्रामपंचायत निवडणुकांचे वातावरण अधिकच तापू लागले आहे.

सामाजिक गट सक्रिय, नवे चेहरे मैदानात

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील सामाजिक गट सक्रिय झाले आहेत. बैठका, चर्चा, रणनीती आखण्यावर भर दिला जात असून, प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्यासाठी युवक वर्गही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. विकासकामे, स्थानिक प्रश्न, पारदर्शकता हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी येत असून, निवडणुका चुरशीच्या ठरण्याची चिन्हे आहेत.

आतापासूनच खर्च; निवडणुकीत काय?

निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याआधीच इच्छुकांकडून विविध कार्यक्रम, सामाजिक व धार्मिक उपक्रम, मदतीचे उपक्रम आणि संपर्क मोहिमांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर खर्च किती वाढेल, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. वाढता खर्च आणि तीव्र स्पर्धा यामुळे सामान्य व नव्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहत असल्याचे चित्र आहे.

Irregularities in grampanchayat: मोहना बु. ग्रामपंचायतीत घोळच घोळ; अभिलेखांत खोडाखोड व फेरफार

सामाजिक पुढाकार घेणाऱ्यांची संख्या वाढली

सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर गावपातळीवर सामाजिक पुढाकार घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. विकास, लोकहित आणि पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यांवर काम करण्याची तयारी अनेकांकडून व्यक्त होत असून, यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व राजकीय हालचाली अधिकच सक्रीय झाल्या आहेत.