The administration’s failure in the reunification of teacher husband and wife : गुगल मॅपवरील अंतर ग्राह्य धरण्याची मागणी; बांधकाम विभागाच्या भूमिकेवर नाराजी
Nagpur शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत प्रशासनाचा खोडा पडल्याने शिक्षकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. अख्खा दिवस सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारून थकलेल्या शिक्षकांनी अंतराच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने गोंधळ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच आता गुगल मॅपवरील अंतरच ग्राह्य धरण्याची मागणी केली आहे.
अंतराचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष स्थळभेट घेतल्याशिवाय दिले जाणार नाही. यामुळे संबंधित शिक्षकांना आपल्या वाहनाने बांधकाम विभागाचे कर्मचारी घेऊन स्थळदर्शन करून आणावे लागत होते. विशेष म्हणजे जे पती-पत्नी कार्यस्थळातील अंतर ४०-५० किमी इतके आहे, त्यांच्या बाबतीतही प्रत्यक्ष मोजमापाची अट लादण्यात आली, हे प्रशासनाच्या अनावश्यक दुराग्रहाचे लक्षण असल्याचा आरोप शिक्षकांनी केला.
Local Body Elections : जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये नवे प्रभाग, इच्थुक लागले कामाला
शिक्षकांच्या मते, राज्य शासनाकडून १२ तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना होत्या. मात्र, नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे बुधवारी पुरावा सादर करण्याच्या सूचना केवळ व्हॉट्सॲपवर दिल्या. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली व शिक्षकांनी भर उन्हात बांधकाम विभागाकडे धाव घेतली. जि. प. प्रशासनाने बदली संबंधातील प्रत्येक बाबींच्या लेखी सूचना वेळोवेळी निर्गमित करणे गरजेचे आहे.
Nago Ganar : शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी फक्त नागपूरसाठी का?
शिक्षकांना झालेल्या त्रासाची दखल घेऊन जि. प. प्रशासन अंतराच्या प्रमाण पत्राबाबत बांधकाम विभागास सुस्पष्ट सूचना द्याव्यात तसेच गुगल मॅपवरील अंतर ग्राह्य धरावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केली आहे.