Breaking

Zilla Parishad Nagpur : Timepass करणाऱ्या ३० कंत्राटदारांना दणका

Penalty on 30 contractors for working at slow speed : जिल्हा परिषद दररोज आकारणार दंड

Nagpur शासकीय कंत्राटे घेऊन त्यानंतर काम करण्यात हलगर्जी दाखविण्याचे प्रकार नागपूर जिल्ह्यात नवीन नाहीत. मात्र जिल्हा परिषदेने जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांत चालढकल करणाऱ्या ३० कंत्राटदारांना दणका दिला आहे. त्यांच्याकडून दररोज दंड आकारण्याची भूमिका घेण्यात आली आहे. हा इतर कंत्राटदारांसाठीदेखील मोठा इशाराच आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ या संकल्पनेतून २०२४ पर्यंत ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा अपेक्षित होता. परंतु, तो न झाल्याने योजनेला मुदतवाढ देण्यात आली. या योजनेत ग्रामीण कुटुंबातील प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने १,३०४ योजनांची कामे वाटप केली आहेत.

Crime in Khamgao : शेगावात मुख्याध्यापिकेला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

मागील वर्षभरापासून त्यात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन मार्ग काढला जात आहे. मात्र, त्यानंतरही काही कंत्राटदारांच्या कामात प्रगती झालेली नाही. अशा संथगतीने कामे करणाऱ्या कंत्राटदारांना दररोज ५०० रुपये दंड आकारला. त्यानंतरही कामांत सुधारणा न झाल्याने काही कंत्राटदारांच्या दंडाच्या रकमेत वाढ करून रोज १००० रुपये दंड आकारला जात आहे.

दंड आकारण्यात आलेल्या कंत्राटराकडून दंडाची रक्कम त्याच्या बिलातून वसूल केली जाणार आहे. ही रक्कम लाखोंच्या घरात जाणार आहे. मागील काही महिन्यांपासून कंत्राटदारांची देयके थकलेली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांच्याही अडचणी वाढल्या आहेत.

Board exams: मुलांना येतंय परीक्षा अन् अभ्यासाचे टेन्शन!

जलजीवन मिशनची जिल्हाभरात एक हजार ३०४ योजनांची सुरू चालू आहेत. यातील ५१६ कामे आजघडीस पूर्णत्वास आली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर तर कुठे योजना झाली, पण वीजपुरवठा नाही. यामुळे ग्रामस्थांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. यामुळे कठोर भूमिका घेत पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.