Tribal parents protest in ZP for educational facilities : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मुलाने केले नेतृत्व, आंदोलनाला राजकीय रंग
Buldhana जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक दुर्लक्षाविरोधात जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पालक आक्रमक झाले. भिंगारा, चाळीस टापरी, गोमाल येथील शाळा व अंगणवाडींमध्ये सुविधा नसल्याने १२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मुलगा यशोवर्धन सपकाळ यांनी केले, ज्यामुळे या आंदोलनाला राजकीय रंग चढल्याची चर्चा सुरू आहे.
भिंगारा येथील जिल्हा परिषद शाळेत नववी-दहावीकरिता शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी केली. “तातडीने शिक्षक नेमावा” ही मागणी यावेळी जोरात झाली.
चाळीस टापरी येथील शाळा व अंगणवाडींच्या इमारतीचे काम मंजुरीनंतरही अपूर्ण आहे. ठेकेदाराने काम न करता पळ काढल्याने हे काम विश्वासू ठेकेदाराला देण्याची मागणीही करण्यात आली.
गोमाल येथील शिक्षक कर्तव्यावर असताना मद्यपान करतो, त्याला बडतर्फ करावे, अशी मागणीही करण्यात आली.
Water crisis : नेते गप्प, योजना ठप्प; सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गावे कोरडीच!
यापूर्वी अनेकदा मागण्या करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आदिवासी पालकांनी हा तीव्र मार्ग अवलंबला. जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
Uday Samant : कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळपुत्र यशोवर्धन सपकाळ यांनी केल्याने राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता काँग्रेस आदिवासी समाजाशी जवळीक साधण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. महायुती सरकारवर आदिवासी शिक्षणाबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.








