No reservation for SC in 18 groups since the establishment of ZP : १२ गटांना एसटी, तर २ गटांना ओबीसी आरक्षण न मिळाल्याचा आरोप
Amravati जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत तब्बल १८ गटांमध्ये अनुसूचित जाती, १२ गटांमध्ये अनुसूचित जमाती, तर दोन गटांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण न मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २० ऑगस्टला जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार काही गट पुढील २५ ते ३० वर्षे आरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने विकेंद्रीकरणाच्या उद्देशालाच धक्का बसणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भाजपचे माजी जि. प. सदस्य तात्या मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात हा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. “मेळघाट विधानसभा क्षेत्रातील दहा गटांना सन १९६० पासून आजतागायत केवळ अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले आहे. यामुळे अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षणापासून ६५ वर्षे वंचित राहिला असून, पुढेही किमान २५ ते ३० वर्षे आरक्षण मिळणार नाही,” असा आरोप त्यांनी केला.
Raut on Bhujbal : तेव्हा तुम्ही शिवसेना सोडली, आता मंत्रिमंडळ सोडणार का?
दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सात गटांमध्ये २००५ पर्यंत सलग अनुसूचित जाती आरक्षण राहिले. नव्या अधिसूचनेनुसार तेथे पुन्हा अनुसूचित जातींचीच सर्वाधिक लोकसंख्या असल्याने त्याच प्रवर्गाचे आरक्षण कायम राहणार आहे. त्यामुळे नामाप्र व सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांचा हक्क नाकारला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या वेळी संदीप वासनिक, इंद्रभूषण सोंडे, विनोद ढोणे, अजय लोयटे, रामू तांबेकर, रूपाली सोंडे, रूपेश ढोले, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.
तात्या मेश्राम यांनी सांगितले की, “पंचायतराज व्यवस्थेचा उद्देश सत्तेचे विकेंद्रीकरण व समाजाच्या शेवटच्या घटकाला सत्तेत सहभागी करणे हा आहे. मात्र, नव्या अधिसूचनेनुसार काही गटांना तब्बल ९० ते ९५ वर्षे आरक्षणापासून दूर राहावे लागेल. हे संविधानाच्या भावनेला छेद देणारे आहे.”
MP Omraje : संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का?
६५ वर्षांपासून ‘एससी’ आरक्षण न मिळालेले गट
धारणी तालुका : बैरागड, तलई, कलमखार, टिटंचा, सावलीखेडा
चिखलदरा तालुका : चुरणी, काटकुंभ, जामली, टेंब्रुसोडा
अचलपूर तालुका : धोतरखेडा
चांदूरबाजार तालुका : करजगाव, शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी
मोर्शी तालुका : पिंपळखुटा (मोठा), अंबाडा
वरूड तालुका : बेनोडा
तिवसा तालुका : कुऱ्हा
धामणगाव तालुका : मंगरूळ दस्तगीर
एसटी आरक्षण न मिळालेले गट
मोर्शी तालुका : नेरपिंगळाई
रिद्धपूर तालुका : रिद्धपूर
वरूड तालुका : आमनेर
तिवसा तालुका : वऱ्हा, तळेगाव ठाकूर
अमरावती तालुका : पुसदा
अचलपूर तालुका : असदपूर
अंजनगाव सुर्जी तालुका : कापूसतळणी
चांदूर रेल्वे तालुका : घुईखेड
धामणगाव रेल्वे तालुका : जुना धामणगाव
नांदगाव खंडेश्वर तालुका : लोणी
फुबगाव तालुका : फुबगाव