BALASAHEB THORAT : थोरांतांच्या धमकीचा निषेध करण्यासाठी हजारो एकवटले

Thousands gathered to protest the threats : संगमनेरमध्ये मोर्चाद्वारे हल्लाबोल; बाळासाहेब थोरात यांनी केलं नेतृत्व

SANGAMNER काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका एकवटला. हजारो नागरिकांनी एकत्र शांती मोर्चा काढला. यावेळी संगमनेर तालुक्याचा विकास रोखून अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज व विविध पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडी आणि विविध आध्यात्मिक व वारकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ भव्य सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. यशोधन कार्यालय ते नवीन नगर रोड असा शांती मोर्चा होता.

Mahavitaran Department : महावितरणचे विपुल चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला !

थोरात म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मी मुलगा आहे. संघर्ष मला नवीन नाही. विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची माझी तयारी आहे. हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊन मी पुढे जातोय. कधीही धर्माचा देखावा केला नाही. चुकीचा वागला त्याला शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह आम्ही धरला.’

NCP Politics : आज स्पष्ट होणार दादांची भूमिका? बंदद्वार चर्चेत पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र?

नवीन लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या अगोदर कधी भगवी टोपी घातली होती का? भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदू हे चुकीचे आहे. चाळीस वर्षांमध्ये हा तालुका आम्ही उभा केला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली. सातत्याने विकासकामे करून तालुका राज्यात अग्रक्रमणाने पुढे नेला. हा विकास काहींना पाहवत नाही आणि म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हत्यार म्हणून आपला तालुका मोडण्याचे षडयंत्र आखले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.