व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Tractor Pola : मेहकरात शिंदे सेना-उद्धव सेनेचे ‘ट्रॅक्टर’ आमने-सामने!

Tractor Pola : मेहकरात शिंदे सेना-उद्धव सेनेचे ‘ट्रॅक्टर’ आमने-सामने!

Shinde Sena-Uddhav Sena’s ‘Tractor Pola’ in Mehkar : सणाच्या निमित्ताने निवडणुकीची तयारी, प्रतापराव जाधव, सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर पोळा

Mehkar राज्यभर पारंपरिक उत्साहात बैलपोळा साजरा होत असताना, मेहकरमध्ये आधुनिकतेशी सुसंगत असा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. येथील शेतकऱ्यांनी ‘ट्रॅक्टर पोळा’ साजरा केला. विशेष म्हणजे आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यापुढे ठेवत शिंदे व उद्धव सेनेच्या नेत्यांनी ट्रॅक्टर पोळ्याचे नेतृत्व केले.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव स्वतः उद्धव गटाच्या ट्रॅक्टरचे सारथी झाले. तर उद्धव गटाच्या ट्रॅक्टर पोळ्याचे नेतृत्व आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले. गेल्या काही वर्षांपासून मेहकरातील हा ट्रॅक्टर पोळा शेतकरी व शहरवासीयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Women Commission : महायुती सरकार देवासारखं, महिला आयोग परिषदेत वक्तव्य

बैलपोळा हा सण परंपरेने बैलांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. मात्र आधुनिक युगात शेतीतील बहुतांश कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होत असल्याने, बैलांच्या बरोबरीने ट्रॅक्टरचाही गौरव व्हावा या उद्देशाने मेहकर येथे या अभिनव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

शहरातील मुख्य मार्गावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत १५० ते २०० ट्रॅक्टर सहभागी झाले होते. वर्षभर शेतात अविरत राबणाऱ्या या आधुनिक सर्जा-राजांनाही यावेळी सणाचा आनंद मिळाला.

या अनोख्या उपक्रमात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह सहभागी झाले.

NCP Politics : अजित पवारांच्या ‘त्या’ भेटीने राजकीय चर्चांना उधाण !

मेहकर शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीनेही ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या सोहळ्यात आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

error: Content is protected !!