One-Hour Daily Shakha — The Real Strength of RSS : अमरावती महानगरात संघाचा विजयादशमी उत्सव
Amravati : १९२५ साली स्थापन झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रोपटे आज वटवृक्षामध्ये परावर्तीत झाले आहे. कुठलीही राजकीय विचारधारा म्हणजे संघाचे बलस्थान नाही, तर संघाचे बलस्थान ही एक तासाची नित्य शाखा आहे आणि हेच शक्तीकेंद्र आहे. संघाचा संघटनात्मक विकास होत असताना संघाने काहीही केले नाही. स्वयंसेवकांना ज्या क्षेत्रात उणीवा वाटल्या, त्या क्षेत्रात स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने काम केले आणि त्यातुनच विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आक्षम अशा विविध समर्पित संघटनांचा उदय झाला, असे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व प्रज्ञा प्रवाहाचे अखिल भारतीय संयोजक जे. नंदकुमार यांनी केले.
अमरावती महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने किरण नगर परिसरातील नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात विजयादशमी उत्सवाचे आयोजन काल (५ ऑक्टोबर) करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जे. नंदकुमार बोलत होते. यावेळी विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, महानगर संघचालक उल्हास बपोरीकर उपस्थित होते. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी वैद्यकीय अभ्यासासोबतच अनुशिलन समितीमध्ये सक्रीय कार्य केले. ही समिती वेगवेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांचे संघटन होती. त्यात डॉक्टरांनी दिलेले योगदान अमुल्य होते, असे जे. नंदकुमार यांनी सांगितले.
Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहिण’च्या ई-केवायसीत सर्व्हरचा खोडा!
कमल गवई यांचा संदेश..
कमल गवई यांना कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पण त्या उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवला. यामध्ये त्या म्हणाल्या, भारत हा प्राचिन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्ट्या जगाचा आदर्श राहिलेला आहे. तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, सम्राट अशोक, संत कबीर, संत तुकाराम, महात्मा पुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, स्वावी विवेकानंद, रामास्वामी पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरूषांनी मानवी मुल्यांना विकसीत करणारी थोर परंपरा भारतामध्ये निर्माण केली.
राष्ट्रीय स्वयसंवेक संघाच्या स्वयंसेवकांनाही उपरोक्त मानवी आणि संविधानिक मुल्यांच्या माध्यमातून भारताला सक्षम राष्ट्र म्हणून विकसीत करण्यीच संधी आहे. संघाच्या शताब्दीपूर्ती विजयादशमी उत्सव संपन्न होत असून सदर कार्यक्रमास काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. या कार्यक्रमासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे कमल गवई यांनी संदेशात म्हटले आहे.