Meditrina Hospital’s Dr. Sameer Paltewar Finally Arrested : मेडिट्रीना हॉस्पीटलमधील १७ कोटींचे घोटाळा प्रकरण
Nagpur : नागपूर शहरातील मेडिट्रीना हॉस्पीटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांच्यावर सिताबर्डी पोलिस ठाण्यात १७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेडिट्रीना हॉस्पीटलमध्ये १७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यांच्यासह पत्नी सोनाली आणि इतर १६ जणांविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अद्याप डॉ. पालतेवार यांना अटक करण्यात आली नव्हती. अखेर काल (५ ऑक्टोबर) त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने EOW अटक केली आहे.
डॉ. समीर पालतवेार यांनी आणि त्यांच्या इतर १३ सहकाऱ्यांनी अनेक शेल कंपन्या स्थापन करून मेडिट्रीना हॉस्पीटलमधून निधी वळवला होता, असे निरीक्षण नुकतेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. धुळे यांनी दिलेल्या निरीक्षणात स्पष्ट केले आहे. न्यायालयाने डॉ. पालतेवार यांय्यासह इतर १३ आरोपींचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला. यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीनदेखील फेटाळून लावण्यात आला होता.
cough syrup : बालकांच्या आरोग्यासाठी सतर्कता ‘त्या’ औषधावर बंदी
१७ सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेने सिताबर्डी पोलिस ठाण्यामार्फत डॉ. समीर पालतेवार, त्यांची पत्नी सोनाली आणि इतर १६ जणांविरूद्ध पाचवा गुन्हा दाखल केला. मेडिट्रीना हॉस्पीटलचे सह संस्थापक गणेश चक्करवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सन २०२० ते २०२४ दरम्याने बनावट कन्सल्टन्सी आणि मार्केटींग बिलांच्या माध्यमातून सुमारे १६.८३ कोटी रुपयांचा निधी हॉस्पीटलच्या खात्यांतून वळवण्यात आला.
Government Schemes: गाजावाजा करुन सुरु केलेली आणखी एक योजना वांद्यात!
नागपूर महानगरपालिकादेखील मेडिट्रीना हॉस्पीटलच्या विविध नियमभंगाच्या तपासात लागली आहे. अग्निशमन विभागाने हॉस्पीटलची इमारत अग्नीसुरक्षेअभावी धोकादायक घोषीत केली आहे. आरोग्य विभागाने हॉस्पीटलच्या आयपीडी परवानगी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती आहे.








