Don’t Provoke the OBCs!” — Chandrashekhar Bawankule Warns Vijay Wadettiwar : उद्धव ठाकरे सरकारचे व्यवहार निजामासारखे होते
Nagpur : २ सप्टेंबरला काढलेला जीआर ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. हा जीआर रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काल (१० ऑक्टोबर) नागपुरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. या मोर्चानंतर राज्याचे महसूल मंत्री आणि मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवारांचा समाचार घेतला. ओबीसींची माथी भडकवू नका, असा इशारा बावनकुळेंनी त्यांना दिला आहे.
राज्य शासनाने काढलेला आदेश हा हैदराबाद गॅझेटपुरता मर्यादित असून ओबीसींची माथी भडकवून संभ्रम निर्माण करू नये, असा स्पष्ट इशारा बावनकुळेंनी दिला. ते म्हणाले, सरकारने जीआर काढताना कोणतीही कुणबी व्यक्ती ओबीसी आरक्षणापासून वंचित राहू नये, ही काळजी घेतली आहे. ओबीसींच्या ३५३ जातींची हित जोपासण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. महायुती सरकार ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
Shiv Sainiks Stage Fiery Protest : सुटका झालेल्या ‘त्या’ शिवसैनिकांचे गावागावांत जल्लोषात स्वागत !
हेतू लक्षात न घेता संपूर्ण महाराष्ट्रात या निर्णयाविरुद्ध आकांडतांडव करून महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, असा संभ्रम निर्माण केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाच्या संपूर्ण रक्षणासाठी अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी शिष्टमंडळाला ओबीसींच्या आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही, असे आश्वासन दिले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ओबीसी समाजाचे आरक्षण गेले. विजय वडेंटीवार त्या मंत्रिमंडळात मंत्री होते. देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर २७ टक्के आरक्षण परत मिळाले. या राज्याला ओबीसी मंत्रालय फडणवीस यांनी मिळवून दिले. राज्याला महाज्योतीच्या माध्यमातून ६७ होस्टेल मिळत आहेत. माझा सवाल आहे तुम्ही सत्तेत असताना ओबीसीसाठी काही करायचे नाही. सत्तेमधून गेल्यावर ओबीसीचा कांगावा करायचा, हे योग्य नाही.
OBCs’ Fight for Justic : ..म्हणे कर्जमाफीची सवय लागलीय, सहकार मंत्र्यांचा घेतला समाचार !
उध्दव ठाकरेंच्या मराठवाड्यात निघणाऱ्या हंबरडा मोर्च्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, “ज्यांनी मराठवाड्याच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष करून निजामासारखे व्यवहार केले; ते आता विकासाच्या गप्पा मारत आहेत.आमचे महायुती सरकार केवळ नावे बदलत नाही, तर मराठवाड्याला विकासात अग्रस्थानी आणण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. महायुती सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी मात्र मराठवाड्यावर निजामासारखा अन्याय केला आणि या भागाला विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. आम्ही केवळ शहरांची नावे बदलली नाहीत, तर मराठवाड्याच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.