PRAHAR launches fierce attack on BJP over farmers’ issues : ५६ इंचाची छाती असलेले मोदी पंतप्रधान असताना शेतकऱ्यांचे हाल
Nagpur : यावर्षी राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू पिकांवा भाव मिळवून देण्यासाठी आक्रमक झाले आहेत. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवणारे बच्चू कडू यांनी आता त्यांनी शेतकऱ्यांवरच टीका केली आहे. शेतकऱ्यांपेक्षा बैल बरा, असं कधी कधी वाटतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात बच्चू कडू म्हणाले, या नालायकांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. कधी कधी वाटतं की शेतकऱ्यापेक्षा बैल बरा. त्याच्या मागून गेलं तर लाथ मारतो आणि समोरून गेलं तर शिंगावर उचलतो. पण अशा बिकट परिस्थितीतही शेतकरी बोलायला तयार नाही. कारण सरकारने शेतकऱ्यांना भांडणात गुंतवून ठेवलं आहे. आय लव्ह मोहम्मद की आय लव्ह महादेव, यातच तरुण पोरं कामाला लावले आहेत. भगवा हाती द्यायचा आणि हिरव्याच्या विरोधात लढायला लावायचं. यातच हिंदू मरत आहे.
सरकारने शेतकऱ्याला जातीच्या भांडणात गुंतवून ठेवलं आहे. ५६ इंचाची छाती असणारे मोदी पंतप्रधान आहेत. तरीही शेतकऱ्यांचे असे हाल सुरू आहेत. त्यांनी ट्रम्पच्या इशाऱ्यावर अमेरिकतला कापूस आयात कर ११ टक्के कमी करून येथे जर गाठी आणल्या असतील, तर यापेक्षा आपले दुर्दैव काय म्हणावं, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. आपले सरकारच शेतकऱ्यांसाठी मारक आहे, असेही ते म्हणाले.
Maoist Movement : भुपतीच्या जुन्या सहकाऱ्यांनीही स्वीकारला होता संविधानाचा मार्ग !
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी पुरता मेला आहे. अशा वेळी सरसकट मदत दिली पाहिजे. इंच इंच पिकवा म्हणणारे मोदी, इंचा इंचालाही भाव देत नसतील, तर हे चुकीचे आहे. एखाद्या मेरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याने ९८ टक्के मार्क्स मिळवूनदेखील त्याला नापास केले जाते, अगदी तशीच परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. आमचा शेतकरी जात पात धर्मांच्या झेंड्यांमध्ये अडकला आहे आणि यातच तो खुष आहे, अशीही टीका बच्चू कडू यांनी केली.








