The official announcement of the alliance is likely to be made on December 26 : 26 डिसेंबरला युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
Pune : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या युतीबाबत मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार एकत्र येण्याची दाट शक्यता असून, युतीची अधिकृत घोषणा येत्या 26 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या युतीची घोषणा खुद्द अजित पवार करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सध्या राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड यांसारख्या प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष युती आणि आघाडीची समीकरणे नव्याने मांडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी स्वतंत्र रणनीती आखल्या जात असून, काही ठिकाणी पारंपरिक युती तुटण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीक वाढत असल्याच्या चर्चांनी राजकारणात खळबळ उडवली आहे.
Activists anger : आ. किशोर जोरगेवार, आपण ही मोठी चूक केली…! कार्यकर्त्यांचा संताप
मुंबईत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवले जाण्याची चर्चा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसनेही मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने ठाकरे गटापासून अंतर ठेवले आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र वेगळेच राजकीय समीकरण आकार घेत असल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी पडद्यामागे जोरदार चर्चा आणि बैठकांचा सिलसिला सुरू असून, दोन्ही बाजूंनी सकारात्मक संकेत दिले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना 26 डिसेंबर रोजी युतीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल, असे सांगत धीर धरण्याचे आवाहन केले आहे. तसेच 24 डिसेंबर रोजी मुंबईत या युतीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. या बैठकीत पुढील रणनीती आणि निवडणुकीचे नियोजन ठरवले जाण्याची शक्यता आहे.
Prashant Jagtap : अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर राजीनामा
जर 26 डिसेंबर रोजी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटांची युती अधिकृतपणे जाहीर झाली, तर राज्याच्या राजकारणात नवे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः पुणे आणि पिंपरी- चिंचवडसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये या युतीचा मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सध्या रंगली आहे.








