India-Bangladesh relations : बांगलादेशला भारतात विलीन करण्याची मागणी !

Gadkari silence while on stage sparks debate : मंचावर असताना गडकरींकडून मौन, चर्चेला उधाण

Nagpur : भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सध्या विविध कारणांमुळे ताणलेले असताना, या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बांगलादेशला भारतात विलीन करण्याची मागणी करण्यात आल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतानाच ही मागणी करण्यात आली, मात्र गडकरी यांनी या विषयावर कोणतेही भाष्य केले नाही.

आगामी टी-20 विश्वचषक 2026 भारतात होणार आहे. मात्र बांगलादेश क्रिकेट मंडळाने भारतात सामने खेळण्याबाबत सुरक्षा कारणे पुढे करत चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशी खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत काही सामने तटस्थ ठिकाणी किंवा इतर देशात खेळवण्याची मागणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात नाराजी व्यक्त होत असून, बीसीसीआयकडून ही भूमिका अतिशयोक्त आणि अनावश्यक असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Municipal elections : छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते

या वादाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटताना दिसत आहेत. “भारत सुरक्षित नाही” असा अप्रत्यक्ष संदेश दिला जात असल्याचा आरोप करत अनेक क्रीडाप्रेमी आणि विश्लेषकांनी बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या भूमिकेवर टीका केली आहे. भारताने याआधी अनेकदा बांगलादेश संघाचे यजमानपद यशस्वीपणे पार पाडले असताना अशा प्रकारच्या शंका उपस्थित करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे हा वाद केवळ क्रीडापुरता मर्यादित न राहता भारत-बांगलादेश राजनैतिक संबंधांतील संवेदनशीलतेचे प्रतिबिंब म्हणून पाहिला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये एका शैक्षणिक संस्थेच्या शताब्दी महोत्सवात बांगलादेशचा मुद्दा थेट मंचावर आला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख उपस्थित होते. तसेच श्रीराम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरु गोविंद देव गिरी महाराज हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Municipal elections : दोन माजी महापौरांना फोडले; मोठी खळबळ

भाषणादरम्यान गोविंद देव गिरी महाराज यांनी बांगलादेशचा उल्लेख करत मोठे विधान केले. “राममंदिर निर्माण हा भविष्यात करावयाच्या विविध कार्यांचा शुभारंभ आहे. आता रामराज्य आणि राष्ट्रनिर्माणाचे कार्य करायचे आहे. यासोबतच बांगलादेश आणि पाकिस्तानमधील काश्मीर म्हणजेच पीओके भारतात विलीन करणे हे आमचे स्वप्न आहे. भारताने असाच पुरुषार्थ गाजवत राहिला तर हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,” असे ते म्हणाले.

Municipal elections : उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार

गोविंद देव गिरी महाराज यांच्या या वक्तव्यानंतर नितीन गडकरी यांनी आपले भाषण केले. मात्र त्यांनी बांगलादेशला भारतात विलीन करण्याच्या मागणीवर किंवा भारत-बांगलादेश संबंधांवर कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे गडकरींच्या मौनाबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

एकीकडे क्रिकेटच्या निमित्ताने भारत-बांगलादेश संबंधांवर तणाव वाढलेला असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या विधानांमुळे हा मुद्दा आणखी संवेदनशील होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

__