Eknath Shinde : शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा राडा; मतदारांनाच केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Shivsena workers assault people : प्रचार दरम्यान किरकोळ वादातून भडकले कार्यकर्ते

Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या BMC elections पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी छोट्याशा वादातून मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे.

दहिसर पश्चिम येथील विठ्ठलवाडी सोसायटी परिसरात शिंदे गटाचा प्रचार सुरू होता. कार्यकर्तेही बेभान झाले होते. ८ ते १० कार्यकर्ते एका घरात पत्रके वाटण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी शिरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना घरात येऊ नका असे सांगितले असता कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी घरातील दोन व्यक्तींवर हल्ला केला.

या मारहाणीचा व्हिडिओ काही लोकांनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला. काही तासांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली. या घटनेमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला असून विरोधकांनी यावरून शिंदे गटावर टीका सुरू केली आहे.

Municipal elections : भाजपच्या चुकीमुळे नाहक त्रास नको, लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ !

व्हिडिओमध्ये दिसते की, काही कार्यकर्ते एका व्यक्तीला रस्त्यावर खेचून मारहाण करत आहेत. आसपासच्या लोकांनी हा प्रकार पाहिला आणि त्याचा व्हिडिओ काढला. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील कार्यकर्तेच जर अशा प्रकारे हिंसाचार करत असतील तर जनतेचा विश्वास कसा मिळवणार? ज्यांच्यासमोर हात जोडून मताचा जोगवा मागतात त्या जनतेलाच राजकीय गुंड मारहाण करतात. ज्या खेंड्याखाई मते मागतात, त्याच झेंड्याने हिंसा करतात, यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Navneet Rana : ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

या घटनेमुळे निवडणुकीच्या प्रचारावरही परिणाम होऊ शकतो. विरोधकांनी या घटनेचा मुद्दा करून शिंदे गटावर टीका सुरू केली आहे. त्यांनी असा दावा केला की, पक्षातील कार्यकर्तेच जर हिंसाचार करत असतील तर जनतेच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार?