CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या स्टील सिटीत किती हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार? मुख्यमंत्र्यांनी आकडा केला जाहीर

gadchiroli-steel-city-will-generate-major-empolyment-cm-fadanvis : फक्त स्थानिक स्थानिकांना प्राधान्य; २ लाख ६१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी करण्याचा संकल्प केला आहे. विविध प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांनी केले आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून तब्बल सुमारे ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यापैकी काही लोकांना नोकऱ्यासुद्धा देण्यात आल्या आहे. त्या देताना फक्त स्थानिक स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले आहेत. विश्वास बसत नसेल तर गडचिरोलीत जाऊन बघा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतील लोकप्रतिनिधींना केले. यावेळी त्यांनी गडचिरोलीत दोन लाख ६१ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीला सुरुवात झाली असल्याचा दावा केला.

गडचिरोलीचा विकास करताना मोठ्या प्रमाणात जंगल आणि झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले. प्रकल्पासाठी जमीन देताना कमीत कमी झाडांची कत्तल होईल याची काळजी घेतली जात आहे. काही खाणींसाठी मात्र झाडे तोडावी लागणार आहे. ते अपेक्षितच आहे. मात्र याची भरपाई पाच कोटी झाडांची लागवड करून केली जाणार आहे. विकास करताना गडचिरोलीचे जल, जंगल आणि जमीन शाबूत राहील याची ग्वाही त्यांनी दिली.

Devendra fadnavis : अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

एकेकाळी गडचिरोली नक्षलवाद्यांचा धुमाकूळ होता. कोणीही येथे उद्योग लावण्याच धजावत नव्हते. आज नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात आला आहे. येथील लोकांची भावनाही आता बदलत चालली आहे. येथे जो काही विकास होऊ घातला आहे तो आपल्यासाठीच आहे असे त्यांना उमगले आहे. संपुष्टात येऊ घातलेला नक्षलवादाचे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. येथे प्रत्येकाच्या हाताला काम मिळणार आहे.

Walmik karad : बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका

आज गडचिरोलीचे आदिवासी ३० तरुण ऑस्ट्रेलियाच्या युनिर्व्हसिटीत शिक्षण घेत आहे. तेथे सर्वांना मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला आहे. डिग्री हातात आल्यावर या सर्वांना त्यांच्याच गावात चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीतील आदिवासी, अनुसूचित जाती आणि ओबीसी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.