Sudhir mungantiwar : पुनर्वसनाशिवाय घराला हात लावू नका, मुनगंटीवारांचा इशारा !

sudhir-mungantiwar-warning-railway-encroachment-action-stop-chandrapur-rehabilitation-issue : चंद्रपूरात अतिक्रमण हटविण्यावर मुनगंटीवारांचा रेल्वेला इशारा, कारवाई थांबवण्याच्या सूचना

chandrapur: पुनर्वसनाशिवाय घराला हात लावू नका, मुनगंटीवारांचा इशारा !: “पुनर्वसनाशिवाय एकाही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही, घरांवर हात टाकायचा असेल तर आधी पर्यायी व्यवस्था करा,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा देत सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. चंद्रपूर येथील रेल्वेलाईनलगत सुरू असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, ही कारवाई तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना थेट शब्दांत सुनावले. “लोकांना बेघर करून विकासाचा डंका पिटू नका,” असा रोखठोक इशारा देत त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार ‘सर्वांना घर’ ही संकल्पना राबवत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या कारवाईमुळे नागरिक रस्त्यावर येणे ही गंभीर बाब आहे.

Sudhir mungantiwar : गुढीपाडव्याला कष्टकऱ्याला दिली नवी उभारी; मुनगंटीवारांकडून हातठेला भेट

मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाकडून सावरकर नगर, जल नगर, उडिया बस्ती आणि महाकाली कॉलरी परिसरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शेकडो कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, “जोपर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी सक्षम पुनर्वसनाची ठोस योजना तयार होत नाही, तोपर्यंत एकही घर पाडले जाणार नाही. प्रशासनाने हे लक्षात ठेवावे.”

बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे, रेल्वे अधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या भावना ऐकून घेताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, हा केवळ अतिक्रमणाचा प्रश्न नसून तो मानवी हक्कांचा आणि जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा प्रशासनाच्या उदासीनतेवर सभागृहात कडक प्रहार

या प्रकरणावर अंतिम तोडगा काढण्यासाठी येत्या मंगळवारी मुंबईत रेल्वेच्या जीएम यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत जिल्हाधिकारीही झूमद्वारे सहभागी होणार असून पुनर्वसनावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

“चंद्रपूरकरांना अन्याय सहन करावा लागणार नाही, गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशाराही त्यांनी दिला. मुनगंटीवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.

Sudhir mungantiwar : महाराष्ट्र विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ सादर

अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली सामान्यांच्या घरांवर गदा येऊ नये, हा ठाम संदेश देत मुनगंटीवार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. आता मुंबईतील बैठकीत काय निर्णय होतो, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.

__