व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nagpur municipal corporation: भाजपचे शिक्षण सभापती हिंदीतून बोलायला लागले, काँग्रेस नगरसेवकाने टोकले

Nagpur municipal corporation: भाजपचे शिक्षण सभापती हिंदीतून बोलायला लागले, काँग्रेस नगरसेवकाने टोकले

High Voltage drama in Nagpur municipal corporation general meeting on hindi-marathi controversy: नागपूर महापालिकेच्या सभेत मराठी विरुद्ध हिंदीचा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा

Nagpur मुंबई-ठाण्यात सातत्याने पेटणारा मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद आता उपराजधानी नागपूरच्या राजकारणातही पोहोचला आहे. नागपूर महापालिकेच्या आमसभेत मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून गुरुवारी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, काँग्रेस नगरसेवकाच्या आक्षेपानंतर त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या नगरसेवकाने हिंदीत विषय मांडणे सुरू केल्याने भाजपला काँग्रेसवर तुटून पडण्याची आयतीच संधी मिळाली. या राड्यामुळे आगामी काळात नागपुरातही भाषिक वाद अधिक उफाळण्याची चिन्हे आहेत.

सभेदरम्यान भाजपच्या शिक्षण समिती सभापती संतोषी नड्डा यांनी एका विषयावर हिंदीतून बोलण्यास सुरुवात केली. त्यावर काँग्रेस नगरसेवक केतन ठाकरे यांनी तात्काळ हरकत घेत, महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर महापालिकेत मराठी भाषा अनिवार्य केली पाहिजे, अशी आक्रमक मागणी महापौरांकडे केली. मात्र, ठाकरे यांचा विरोध शमतो न शमतो, तोच काँग्रेसचेच दुसरे नगरसेवक वसीम खान यांनी हिंदीत आपले म्हणणे मांडणे सुरू केले.

या विरोधाभासामुळे सत्ताधारी भाजपने काँग्रेसची जोरदार कोंडी केली. एका बाजूने मराठीचा पुळका दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच हिंदीत बोलायचे, असा हल्लाबोल करत भाजप सदस्यांनी काँग्रेसला घेरले. दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने महापालिकेच्या सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज काही काळ विस्कळीत झाले.

FDA : सुटे खाद्यतेल विकले तर कारवाई अटळ; तुकाराम मुंढेंचा विक्रेत्यांना थेट इशारा

राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या केलेल्या सक्तीविरोधात ठाकरे गट, मनसे आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसने मुंबईत रान उठवले होते. वाढता विरोध पाहून तत्कालीन सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला होता. दक्षिणेतील राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही हिंदीच्या ‘कथित सक्ती’वरून केंद्र आणि भाजपला लक्ष्य करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. मात्र, नागपूर महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांच्याच आपापसातील वेगवेगळ्या भूमिकेमुळे हा भाषिक वाद काँग्रेसवरच शेकल्याचे पाहायला मिळाले.

error: Content is protected !!