Who Will Come After Modi? Sanjay Raut’s Big Claim; RSS-Favoured Leader May Get Deputy PM Post : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत; संघाच्या मर्जीतील नेत्याला उपपंतप्रधानपद मिळणार असल्याचा दावा
Mumbai : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतील एका नेत्याची उपपंतप्रधानपदी नियुक्ती केली जाणार असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद सोडावेच लागणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान केले जाणार नाही, असा दावा करत राऊत यांनी राजकीय वर्तुळात मोठा बॉम्ब फोडला आहे.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा हा शेवटचा कार्यकाळ आणि शेवटचा वाढदिवस ठरेल, या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करताना त्यांनी सांगितले की, सध्या प्रायोगिक तत्त्वावर केंद्रीय मंत्रिमंडळातील एका मंत्र्याची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाईल. हा नेता दिल्लीतीलच असून तो संघाचा निष्ठावंत स्वयंसेवक आहे. तसेच अमित शाह यांना संघाची मान्यता नसल्याने त्यांचे गृहमंत्रीपदही काढून घेतले जाण्याची शक्यता असून, याच अंतर्गत घडामोडींमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल रखडल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
Contractor Threat : ठेकेदाराला ‘विद्युत दाहिनीत जिवंत जाळण्याची’ भाषा, सभागृहात खळबळ
दुसऱ्या बाजूला, शिवसेनेतील अंतर्गत लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या शिंदे गटावरही संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना ही चोरलेली मालमत्ता आहे की नाही, याचे उत्तर आधी एकनाथ शिंदेंनी द्यावे, असे थेट आव्हान त्यांनी दिले. पक्षात लोकशाही नव्हती असा दावा करणाऱ्या शिंदे गटाला सवाल करत राऊत म्हणाले की, मग महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुम्ही नेमक्या कोणाच्या आदेशाने मंत्री आणि नेते झालात? पक्षात जर लोकशाही नव्हती, तर मग या सर्व गोष्टी कशा घडल्या, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिंदे गटाच्या दाव्यांवर जोरदार पलटवार केला.








