व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nagpur Voter List : नागपूरच्या मतदार यादीत ‘कलर कोडिंग’चा घोळ; काँग्रेसचा भाजपसह...

Nagpur Voter List : नागपूरच्या मतदार यादीत ‘कलर कोडिंग’चा घोळ; काँग्रेसचा भाजपसह प्रशासनावर गंभीर आरोप

Chaos Over ‘Color Coding’ in Nagpur’s Voter List; Congress Makes Serious Allegations Against BJP and Administration : देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात प्रकार समोर आल्याने इतर मतदारसंघांबाबतही संशय

Nagpur : नागपूर शहरातील मतदार याद्यांच्या पुनर्रचनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपला जिंकवण्यासाठी ‘दुरुस्तीकरणा’च्या नावाखाली मतदार याद्यांमध्ये फेरफार केली जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे. या आरोपांना पुष्टी देणारा एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, भाजपच्या एका अंतर्गत यादीत मतदारांच्या नावांना विविध रंगांनी ‘कलर कोड’ करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

यामध्ये भाजपच्या हक्काच्या मतदारांच्या नावांवर लाल, विरोधकांच्या मतदारांवर पिवळा, तर अल्पसंख्याक व मुस्लिम मतदारांच्या नावांवर हिरव्या स्केचपेनने टीकमार्क करण्यात आले आहे. हा प्रकार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात समोर आल्याने विरोधकांनी इतरही मतदारसंघांत अशीच छाटणी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

sharad pawar : शरद पवारांनी दिले विखे पाटलांना प्रत्युत्तर, मराठा आरक्षणाचा वाद पेटणार

या कलर कोड केलेल्या यादीत सुरुवातीला १,६४० मतदार (६६१ पुरुष व ६७५ महिला) होते; मात्र प्रशासनाची प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर त्यातील तब्बल ३८१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही नावे रंगांच्या वर्गवारीनुसारच जाणीवपूर्वक कापली गेली का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नागपूर शहराच्या प्रारूप मतदार यादीतून प्रशासनाने एकूण १४ लाख ४२ हजार मतदारांची नावे मृत किंवा स्थलांतरित असल्याचे सांगून वगळली आहेत. मात्र प्रारूप यादी येण्याआधीच ही कलर कोड केलेली यादी समोर आल्याने ही छाटणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा संशय बळावला आहे.

Contractor Threat : ठेकेदाराला ‘विद्युत दाहिनीत जिवंत जाळण्याची’ भाषा, सभागृहात खळबळ

दुसऱ्या बाजूला, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. निवडणुकीच्या नियोजनासाठी मतदारांच्या याद्यांवर रंगांनी खणाखूणा करणे ही एक सामान्य पद्धत असून यात काहीही गैर नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, काँग्रेसने या प्रकाराची तुलना बिहार आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या मतदार याद्यांच्या वादाशी केली आहे. तेथेही शुद्धीकरणाच्या नावाखाली लाखो मतदारांची नावे कापल्यानंतर राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. आता नागपुरातही तसाच प्रकार घडल्याचा दावा करत विरोधकांनी निवडणूक प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.

error: Content is protected !!