व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार बावनकुळे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार बावनकुळे

शेतकऱ्यांची भेट घेऊन तक्रारी ऐकून घेणार, ३ ऑक्टोबरला अकोला दौरा

Akola राज्याचे महसूल मंत्री तथा कोरडा दुष्काळ राज्य उपसमितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे हे ३ ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. भाजप नेते तथा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी ही माहिती दिली.

बावनकुळे यांच्या दौऱ्यात पीक नुकसानीचे पंचनामे, दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध अडचणींची माहिती घेतली जाणार आहे. शनिवारी (३ ऑक्टोबर) सकाळी ९ ते १० या वेळेत अकोला शहरासह परिसरातील शेतकऱ्यांकडून ते निवेदने स्वीकारणार आहेत.

शॉर्ट सर्किट सुरू असताना कक्षसेवक वऱ्हांड्यात झोपले होते, माजी पालकमंत्र्यांचा दावा

यानंतर ते अकोला तालुक्यातील येवता येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर बाळापूर तालुक्यातील मानकी येथे शेतकऱ्यांची भेट घेतील. तसेच पारस येथे शेतकऱ्यांकडून निवेदने स्वीकारणार आहेत.

या दौऱ्यात पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महापौर शारदाताई खेडकर, जयंत मसने, संतोष शिवरकर, विजय अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!