Breaking

Dapoli Politics : विरोध संपला, विश्वास वाढला: संजय कदम यांची योगेश कदमांना साथ !

Sanjay Kadam supports Yogesh Kadam in Dapoli : गावागावांमध्ये असलेला राजकीय संघर्ष संपुष्टात आला

Dapoli : दापोलीचे माजी आमदार आणि शिवसेना उपनेते संजय कदम यांनी रविवारी (१३ एप्रिल) फरारे (मोगरेवाडी) येथे झालेल्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण राजकीय घोषणा केली. “पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही शिवसेनेचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,” असे सांगत त्यांनी नमूद केले की, “योगेशदादांना आम्ही पुढच्या निवडणुकीत एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवून देणार आहोत.”

या कार्यक्रमात फरारे (मोगरेवाडी) येथील संपूर्ण वाडीने एकमुखी निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पक्षप्रवेश करून आपला विश्वास व पाठिंबा जाहीर केला. या पक्षप्रवेशामुळे गावागावांमध्ये असलेला राजकीय संघर्ष संपुष्टात आला आहे. विकासकामांना नवे बळ आणि गती मिळत आहे.

Shirpur ZP School : शिरपूर येथे भरली आजी-माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची अनोखी शाळा!

संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दापोली मतदारसंघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. मंत्री योगेश कदम यांच्या विरोधातील वातावरण आता पूर्णतः निवळले आहे. “ज्यांच्या विरोधात आम्ही पूर्वी निवडणूक लढवली, त्यांच्याच नेतृत्वाला आता पाठिंबा देत आहोत, हीच आमची निष्ठा आणि बांधिलकी दर्शवते,” असेही संजय कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Vijay Wadettiwar : योजना लागू केली तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली होती का?

योगेश कदम यांच्या नेतृत्वात दापोली मतदारसंघात विकासकामांचा वेग वाढला आहे. त्यांचा सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क आणि कामाची पारदर्शकता यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. उपनेते संजय कदम यांच्या सक्रिय पाठबळामुळे दापोली हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला ठरणार, असा आत्मविश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.