व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा मार्ग, मुनगंटीवारांनी राजधानीत उलगडली अमूल्य विचारधारा

भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा मार्ग, मुनगंटीवारांनी राजधानीत उलगडली अमूल्य विचारधारा

नवी दिल्लीतील जन्मशताब्दी त्रिवेणी पर्वात गायत्री परिवाराच्या कार्याचा गौरव; गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आणि वंदनीय माता भगवती देवी शर्मा यांना अभिवादन

New delhi भारताची महानता केवळ त्याच्या भौगोलिक विस्तारात, सामर्थ्यात किंवा ऐतिहासिक वैभवात सामावलेली नसून हजारो वर्षांच्या तपश्चर्येतून विकसित झालेल्या अध्यात्म, संस्कार, मानवता आणि विश्वकल्याणाच्या उदात्त विचारपरंपरेत आहे. हीच अमूल्य भारतीय संस्कृती जनाजनांच्या मनामनांत रुजवून तिचा प्रकाश संपूर्ण विश्वात पोहोचविण्याचे कार्य गायत्री परिवार करीत आहे. वंदनीय माता भगवती देवी शर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सोहळा हा केवळ एका महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणाचा उत्सव नसून भारताच्या सनातन सांस्कृतिक चेतनेला नव्याने जागृत करण्याचा आणि भावी पिढ्यांपर्यंत आध्यात्मिक मूल्यांचा वारसा पोहोचविण्याचा संकल्प आहे, या शब्दांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राजधानी नवी दिल्ली येथे केले विचारधारा उलगडली.

पवित्र सोहळ्यात सहभागी होता आल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. तसेच भारतीय संस्कृतीच्या महानतेचा, राष्ट्रप्रेमाचा आणि मानवसेवेच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा प्रभावी जागर केला.

या कार्यक्रमाला केंद्रीय युवा कार्य व क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया, गायत्री परिवाराचे डॉ. चिन्मय पंड्या, विश्व हिंदू परिषदेचे महासचिव स्वामी विज्ञानानंद, रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी सर्वलोकानंद, उत्तर प्रदेशचे आमदार श्री. राजेश्वर सिंह यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महात्मे आणि मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होते.

कुराणासोबत गीता हाती घेणाऱ्या मुस्लिम कन्येचा संदेश : धर्माच्या पलीकडे माणुसकी; सुधीर मुनगंटीवारांचे मोलाचे सहकार्य!

परम वंदनीय माता भगवती देवी शर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच अखंड ज्योतीच्या अवतरणाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यात बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, संत-महात्म्यांच्या विचारांनी समृद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीतून दिल्लीच्या या पवित्र भूमीत येऊन गायत्री परिवाराच्या सान्निध्यात सहभागी होणे, हा माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा क्षण आहे. हजारो ऊर्जा निर्माण करणाऱ्या वीजकेंद्रापेक्षाही अधिक सकारात्मक ऊर्जा या परिवाराच्या सहवासातून अनुभवायला मिळाली. या सोहळ्याचे आमंत्रण दिल्याबद्दल गायत्री परिवाराचे डॉ. चिन्मय पंड्या यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

माता भगवती देवी शर्मा आणि वेदमूर्ती पं. श्रीराम शर्मा आचार्य यांच्या कार्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, गंगा ऋषिकेश आणि हरिद्वारच्या भूमीतून वाहते, हे सर्वश्रुत आहे; मात्र या महान विभूतींनी समाजाला दिलेली वैचारिक आणि आध्यात्मिक गंगा प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रवाहित होत आहे. त्यांचे कार्य केवळ व्यक्तिमत्त्व घडविण्यापुरते मर्यादित नसून समाजाच्या विचारविश्वाला नवी दिशा देणारे आहे. भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांची जाणीव करून देत त्यांनी मानवतेचा व्यापक विचार समाजासमोर ठेवला.

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हवालदिल; पाणी, वीज, चारा अन् सिंचनासाठी सुधीर मुनगंटीवारांचा प्रशासनाकडे आक्रमक पवित्रा

मानवतेची सेवा हीच सर्वोच्च पूजा!

गायत्री परिवाराच्या कार्याचे कौतुक करताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, देवपूजा आणि मंदिरातील उपासनेपलीकडे जाऊन माणुसकीची पूजा करण्याची शिकवण गायत्री परिवाराने दिली आहे. केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे म्हणजे धर्म नव्हे, तर मानवतेची सेवा करणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे हीच खरी आणि सर्वोच्च पूजा आहे. मानवता हाच धर्म मानून समाजाला एकत्र आणण्याचे गायत्री परिवाराचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. गायत्री मंत्र हा केवळ काही शब्दांचा समूह नसून तो मनुष्याच्या अंतर्मनात ऊर्जा निर्माण करणारा, जीवनाला श्रेष्ठ दिशा देणारा आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग दाखविणारा मंत्र आहे. भारतीय संस्कृतीच्या या आध्यात्मिक सामर्थ्याची ओळख संपूर्ण जगाला करून देण्याचे कार्य गायत्री परिवार करीत आहे. जगातील अनेक संस्कृती आणि सभ्यतांच्या प्रवाहात भारतीय संस्कृतीने आपल्या उदात्त मूल्यांच्या बळावर स्वतंत्र आणि अमिट स्थान निर्माण केले आहे. ही संस्कृती केवळ भारताची ओळख नसून संपूर्ण विश्वाला कल्याणाचा मार्ग दाखविणारी विचारधारा आहे, असेही आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.

भारतात जन्म घेणे ही हजारो जन्मांची पुण्याई

भारताच्या राष्ट्राभिमानाविषयी भावना व्यक्त करताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, जगातील सर्वांत सुंदर देश कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर भारत हेच आहे. हजारो जन्मांच्या पुण्याईने या पवित्र भूमीत जन्म घेण्याचे भाग्य लाभते. यापेक्षा सुंदर आणि समृद्ध देश दुसरा असू शकत नाही. आपल्याला पुन्हा जन्म घेण्याची संधी मिळाली, तर तो जन्म भारतभूमीतच व्हावा, अशी प्रत्येकाच्या मनात भावना असली पाहिजे. भारताला केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.

मुनगंटीवार म्हणाले, पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, सुधाकर कोहळेंना बहुमताने निवडून द्या !

शरीराच्या आरोग्याइतकेच मनाचे आरोग्यही महत्त्वाचे

डॉ. चिन्मय पंड्या यांच्या कार्याचा विशेष गौरव करताना ते म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर उत्तम रुग्णालय उभारून वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान देण्याची संधी त्यांच्यासमोर होती. मात्र त्यांनी समाजाच्या मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी स्वतःला समर्पित केले. शरीराच्या आरोग्याइतकेच मनाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे, या जाणिवेतून ते करीत असलेले कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या या सेवाभावी आणि आध्यात्मिक कार्याला आमदार मुनगंटीवार यांनी वंदन केले.

शेतकरी संकटात तर मुनगंटीवार सर्वांत पहिले मैदानात; समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा

भारताच्या सांस्कृतिक महानतेचा गौरव

जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी अत्यंत अभिमानाने भारतीय असल्याचा अभिमान आणि देशाच्या महानतेविषयीची भावना व्यक्त केली. सूर्य आणि चंद्र असेपर्यंत भारताची महानता आणि भारतीय संस्कृतीचे तेज अखंड राहील; मात्र त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या कृतीतून या महान परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आ.मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

 

error: Content is protected !!