Thackeray group karyakartas vandalize in the Municipal Corporation : संतप्त कार्यकर्त्यांनी घागऱ्या फोडून नोंदवला निषेध
Akola शहरातील वाढती पाणीटंचाई आणि नागरिकांना दर पाचव्या दिवशीच होणारा पाणीपुरवठा यावरून आज, गुरुवार, दि. १७ एप्रिलला शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली. या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी घागऱ्या फोडून निषेध व्यक्त केला, तसेच कार्यालयात काही प्रमाणात तोडफोडही झाली.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक मंगेश काळे शहर प्रमुख राहुल कराळे यांनी केले. त्यांच्यासोबत शिवसेना कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जलप्रदाय विभागातील कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अधिक उग्र भूमिका घेतली. घागरी फोडून निषेध नोंदवला व खुर्च्यांची तोडफोड केली.
Churmura Grampanchayat : पाणी द्या, नाहीतर फाशी घेतो; गावकऱ्यांनी उपसरपंचांना कोंडले
मलकापूर, शिवनी, खडकी, शिवर हे हद्दवाढ भाग पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त आहेत. या परिसरात पाच दिवसांनी देखील नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार महिलांनी यावेळी केली. महिलांना घरगुती कामांसाठी टाक्यांवर अवलंबून राहावे लागत असून, शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.
Local Body Elections : कुणाची संधी हुकली; काहींना पुन्हा लॉटरी!
आंदोलनानंतर प्रशासनाने पाणीपुरवठा सुधारण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या या आश्वासनाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न आता अधिक गंभीर होत चालला आहे. शिवसेनेच्या आंदोलनामुळे प्रशासनाला जाग आली असली, तरी खऱ्या अर्थाने पाणीपुरवठा सुरळीत होतो का, याकडे अकोल्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.