Breaking

MNS : ९० टक्के लोकांची भूमिका; अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचेच नाव द्या !

 

People want Amravati Airport to be named after Dr. Punjabrao Deshmukh : गुलाबराव महाराज यांचं नावं मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला द्या

Amravati : अमरावती विमानतळाचे लोकार्पण झाले, उड्डाणही सुरू झाले. पण विमानतळाच्या नामकरणाचा वाद मिटता मिटत नाहीये. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचेच नाव विमानतळाला द्यावे, ही मागणी जोर धरत आहे. या वादात ाता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचेच नाव द्यावे, अशी जिल्ह्यातील ९० टक्के लोकांची भूमिका असल्याचे मनसेने म्हटले आहे.

यासंदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील म्हणाले, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, घटना समितीचे सदस्य व अमरावतीचे सुपुत्र डॉ. पंजाबराव देशमुख यांचं नाव अमरावती विमानतळाला देण्याची आमची मागणी आहे आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळालं पाहिजे, अशी 90 टक्के लोकांची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

Amravati airport : उड्डाण घेतले, पण गोंधळ संपला नाही!

पंजाबराव देशमुख यांचे नाव अमरावती विमानतळाला मिळेल, असा विश्वासही पप्पू पाटील यांनी व्यक्त केला. गुलाबराव महाराज यांचं नाव अमरावती विमानतळाला द्यावं, अशीही मागणी पुढे येत आहे. त्यावर गुलाबराव महाराज यांचं नावं मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला देण्यात यावे. कारण या लायब्ररीमध्ये गुलाबराव महाराज गेले होते. तेथे पुस्तकं कशी लावावी, हेही त्यांनी सांगितली होते. गुलाबराव महाराजांनी १३६ ग्रंथ लिहीलेले आहे. त्यामुळे गुलाबराव महाराजांचं नाव एशियाटिक लायब्ररीला देणं संयुक्तिकत राहील, असे पाटील म्हणाले.

Amravati Airport : कंपनीने परस्पर केले विमानतळाचे नामकरण!

अमरावती विमानतळ भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या तालुक्यात आहे. त्यामुळे विमानतळाला त्यांचेच नाव देणे योग्य राहील. हे आम्हीच नाही तर जिल्ह्यातील ९० टक्के जनता म्हणत आहे. अमरावती जिल्हा हा पंजाबराव देशमुख यांचा म्हणून ओळखला जातो. यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, असेही पप्पू पाटील यांनी सांगितले.