Breaking

Amravati Airport : अमरावती विमानतळाच्या नामकरणावरून वातावरण पेटतेय !

 

MP Balwant Wankhade warns of agitation to name Amravati airport after Dr. Punjabrao Deshmukh : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावासाठी खासदार बळवंत वानखडेंचा आंदोलनाचा इशारा !

Amravati : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह इतर पाहुण्याच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले. अन् याच वेळी नामकरणाचा वाद उफाळून आला. विमानतळाच्या नामकरणाचा वाद वाढवून अमरावतीकरांच्या भावनांशी खेळ केला जात आहे, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचं नाव देण्याची मागणी असताना प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांचं नाव समोर आलं. मात्र अधिकृत घोषणा न होता विमानतळ व विमान कंपनीच्यावतीने मोठी घोडचूक करत अमरावतीकरांच्या भावनांशी खेळ चालू आहे. अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव द्या, अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी रेटून ठरली आहे.

MNS : ९० टक्के लोकांची भूमिका; अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचेच नाव द्या !

विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गुलाबराव महाराजांबद्दल कुठलीही नाराजी नाही. ते आदरणीय आहेतचं, परंतु पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्या तालुक्यात अमरावती विमानतळ आहे. ते देशाचे पहिले कृषिमंत्री होते. घटना समितीतसुद्धा सदस्य होते. पंजाबराव देशमुख यांचं काम मोठं आहे. त्यांचं नाव न दिल्यानं लोकांची मने दुखावली आहेत. आताही डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव न दिल्यास मोठे आंदोलन होईल, असा इशारा खासदार बळवंत वानखडे यांनी दिला.