व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amit Shah : ‘त्या’ अर्ध्या तासात नेमकी काय खलबतं? राज्यात चर्चांना उधान

Amit Shah : ‘त्या’ अर्ध्या तासात नेमकी काय खलबतं? राज्यात चर्चांना उधान

amit-shah-mumbai-political-discussion : अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्र प्रवास !

Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून अर्ध्या तासाहून अधिक काळ प्रवास केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

अमित शाह सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांत अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यातील भेटी वाढल्याने या संवादाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापूर्वी रक्षाबंधनानंतरही दोन्ही नेत्यांची विमानतळावर भेट झाली होती. त्यामुळे आता पुन्हा झालेल्या या दीर्घ संवादामुळे राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची, यासंदर्भातील सुनावणी सुरू असून शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील चर्चेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहेस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी शाह संवाद साधणार आहेत. एशियाटिक सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ असा दर्जा देण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

Sanjay Raut : ‘सरकारला शिव्यांची भाषा कळत असेल तर तीच वापरावी’

अमित शाह यांच्या भेटीमुळे या मागणीला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीदरम्यान संस्थेतील दुर्मीळ पोथ्या आणि ऐतिहासिक साहित्याचे प्रदर्शनही शाह यांना दाखवण्यात येणार आहे. संस्थेत पांडुरंग वामन काणे यांनी लिहिलेल्या पाच खंडांतील ‘भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे जतन करण्यात आले आहे. भारतीय कायदेव्यवस्थेच्या ऐतिहासिक संदर्भात या ग्रंथाला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते.

Sanjay Gaikwad : ‘बाप तो बाप रहेगा’, आमदार संजय गायकवाडांना भोवलं

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती राहणार आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाह लालबागच्या राजाचे तसेच चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेणार आहेत. मात्र, या सर्व कार्यक्रमांपेक्षा अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्रित प्रवास आणि त्यादरम्यान झालेली चर्चा सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय विषयांवर खलबतं झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

error: Content is protected !!