Nitin Gadkari : गडकरींना आणखी एक डॉक्टरेट!

 

Gadkari awarded doctorate from Vasantrao Naik Marathwada Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून गौरव

Nagpur ‘मी इंजिनियर नाही. मी विद्वान नाही. पण मला सात डॉक्टरेट मिळाल्या. त्यातील बहुतांश कृषी क्षेत्रातील कामांसाठी आहेत’… हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातील शब्द आहेत. आता या सात डॉक्टरेटमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. शनिवार, दि. १९ एप्रिलला त्यांना आणखी एक डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने त्यांना ही डॉक्टरेट (डी. एस्सी., डॉक्टर ऑफ सायन्स) प्रदान करण्यात आली. या डॉक्टरेटमुळे गडकरी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यापीठाच्या वतीने आयोजित 26व्या दीक्षांत समारोहात गडकरी उपस्थित नव्हते. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. इंद्र मणी यांनी गडकरींच्या निवासस्थानी आयोजित अनौपचारिक सोहळ्यात त्यांना ही डॉक्टरेट प्रदान केली.

Nitin Gadkari : इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती ! गडकरींनी ऐकवली कविता..

जल संवर्धन, जैव इंधन विकास, जैविक आणि प्राकृतिक शेती, कृषि विविधिकरण आणि ग्रामीण विकासात गडकरींच्या अमूल्य योगदानासाठी ही डॉक्टरेट प्रदान करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. यापूर्वी देखील गडकरींना महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आसाम राज्यातील विद्यापीठांनी मानद डी.लिट, डी.एससी. तथा पीएच.डी. अशा पदव्या बहाल करून गौरविले आहे.

Nitin Gadkari : गडकरींचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, प्रश्नच मार्गी लागला!

यामध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उत्तर प्रदेश येथील गलगोटियाज विद्यापीठ, गुवाहाटी येथील आसाम डाऊन टाऊन विद्यापीठ, गाझियाबाद येथील एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.