Breaking

Nail disease : ४० लोकांची नखं गळाली; डॉक्टर म्हणतात, पुन्हा येतील!

 

The number of infected people has increased : बाधितांची संख्या वाढतेय, शेगाव तालुक्यावर संकट

Buldhana शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि परिसरातील गावांमध्ये आता नखगळतीच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. याआधी डिसेंबर-जानेवारी महिन्यात केसगळतीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्याच रुग्णांमध्ये आता हात-पायांची नखे गळण्याचे प्रकार उघडकीस येत आहे. बाधितांची एकूण संख्या ४०च्या घरात पोहोचली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरच्या (ICMR) पथकाने त्या काळात नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले होते. मात्र, त्याचा अहवाल अद्याप आरोग्य विभागाला प्राप्त झालेला नाही. नागरिकांमध्ये या विलंबामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी विशेष पथक प्रभावित गावांमध्ये पाठवले असून, गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी सुरू आहे. बुधवारी नव्याने तिघांमध्ये नखगळतीचे लक्षणे आढळून आली आहेत.

Nitin Gadkari : गडकरींना आणखी एक डॉक्टरेट!

“केसगळती झालेल्या रुग्णांमध्ये नखगळती आढळत आहे. हा दीर्घकालीन (क्रॉनिक) परिणाम आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. ज्या विषारी घटकांमुळे केस गळाले, त्याचमुळे नखेही गळत आहेत. हे टॉक्सिन्स शरीरातून ४ ते ६ महिन्यांत बाहेर पडल्यानंतर नखे पुन्हा पूर्ववत येतील, असे जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सांगितले.

Dr. Amol Kolhe : विकास म्हणजे नांगर फिरवणे नव्हे!

डिसेंबर २०२४ पासून शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास जाणवू लागला होता. आता याच रुग्णांमध्ये नखे कमजोर होणे, विद्रूप होणे आणि अखेर गळून पडण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी, या नवीन साथीमुळे नागरिक धास्तावले आहेत.